Join us

‘तुझी चड्डी नाही उतरविली तर...’ या आदित्य नारायणच्या धमकीवर नेटिझन्सनी काढला ‘चड्डीगेट’ सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 19:45 IST

इंडिगोच्या कर्मचाºयांना धमकी देणे आदित्य नारायणला चांगलेच महागात पडताना दिसत आहे. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सध्या भलताच चर्चेत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच आदित्यला इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकाºयांशी उद्धटपणे बोलताना बघण्यात आले होते. विशेष म्हणजे, आदित्यच्या या उद्धटपणाचा एक संपूर्ण व्हिडीओ बनविण्यात आला होता. ज्यामध्ये आदित्य इंडिगो कर्मचाºयांना म्हणत आहे की, ‘मी तुला मुंबईत बघून घेईल. कधी ना कधी तू मुंबईत येणारच, मग तुला बघून घेईल. तुझी चड्डी उतरविली नाही तर माझे नाव आदित्य नारायण नाही.’ आदित्यच्या या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. फेसबुक आणि ट्विटरवर आदित्यच्या चड्डी उतरविणाºया डायलॉगची चांगलीच खिल्ली उडविली जात आहे. {{{{facebook_video_id####https://www.facebook.com/tapputeens/videos/283261872174729/">आदित्यच्या याच डायलॉगच्या अनुषंगाने काही नेटिझन्सनी चित्रपटातील डायलॉगची डबिंग करून व्हिडीओ तयार केले आहेत. शिवाय आदित्यची ट्विटरवर चांगलीच खिल्लीही उडविली जात आहे. एका युजरने गोविंदाच्या एका चित्रपटातील व्हिडीओ सीन डब करून त्यात आदित्यच्या या डायलॉगला खिल्ली उडविणाºया अंदाजात नेटिझन्सपर्यंत पोहोचविले आहे. व्हिडीओमध्ये गोविंदा न्यायालयाच्या कटघºयात उभा असताना वकिलाला विचारत आहे की, ‘तू अंडरवियर घातली आहे काय?’ या सीनला लगेचच आदित्यचा चड्डी उतरविणारा सीन जोडला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आदित्य नारायण लघुपट - चड्डीगेट’ तर दुसºया एका युजरने लिहिले आहे की, ‘इंडिगो स्टाफने एकदा मला म्हटले होते की, माझी बॅग खूप भारी आहे. तेव्हा मी बॅगमधील चड्डी काढून परिधान केली होती. ज्यामुळे बॅगचे वजन खूपच कमी झाले होते. असो, आदित्यच्या या प्रतापाचे आता सोशल मीडियावर पडसाद उमटत असून, हे प्रकरण कुठवर पोहोचणार हे सांगणे मुश्कीलच म्हणावे लागणार आहे.