Join us  

बॉलिवूडमध्ये दशकभराचा काळ घालवल्यानंतर अदिती राव हैदरीने घेतला एक मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 8:52 PM

पुढील वर्षी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिला बॉलिवूडमध्ये येऊन एक दशक पूर्ण होईल. पण या दहा वर्षांतील तिचा करिअर ग्राफ बघितला तर अदितीच्या हाती फार काही लागले नसल्याचे लक्षात येईल.

पुढील वर्षी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिला बॉलिवूडमध्ये येऊन एक दशक पूर्ण होईल. पण या दहा वर्षांतील तिचा करिअर ग्राफ बघितला तर अदितीच्या हाती फार काही लागले नसल्याचे लक्षात येईल. प्रेक्षक स्मरणात ठेवतील, असा एकही चित्रपट आजपर्यंत अदितीच्या वाट्याला आलेला नाही. साहजिकच याची खंत बाळगण्यासोबतचं एका विशिष्ट काळानंतर याचे नैराश्य येणे साहजिक आहे. अदितीही याच नैराश्यातून जातेय, असे आम्ही मुळीच म्हणणार नाही. पण होय, बॉलिवूडमध्ये मनासारखे काम करत नाही म्हटल्यावर अदितीने स्वत:च बॉलिवूड सोडून साऊथ इंडस्ट्रीवर फोकस करायचे ठरवले आहे, मी आता साऊथ इंडस्ट्रीवर फोकस करणार. कारण तिथे अधिक चांगल्या भूमिका आहेत, असे अदितीने अलीकडे सांगितले.३२ वर्षांच्या अदितीने सन २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली6’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. २०१७ मध्ये आलेला ‘भूमी’ हा तिचा बॉलिवूडमधला अखेरचा चित्रपट होता. हे दोन्ही चित्रपट फ्लॉप राहिलेत आणि या दोन चित्रपटांदरम्यानच्या प्रवासात अदिती केवळ यशासाठी संघर्ष करताना दिसली. याऊलट अगदी अलीकडे साऊथचे जे काही एक दोन सिनेमे तिने केलेत, ते हिट राहिलेत. अदितीने नुकताच ‘सम्मोहनम’ या तेलगू चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू केला. हा चित्रपट सुपरहिट राहिला. या चित्रपटामुळे अदितीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जे बॉलिवूड इतक्या वर्षांत देऊ शकले नाही, ते साऊथ इंडस्ट्रीने अगदी पहिल्याच संधीला दिले, हे पाहून ती सुखावली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपला संपूर्ण फोकस साऊथ सिनेमांकडे वळवण्याचा निर्णय तिने म्हणे घेतलाय.अदिती हैदराबादेत जन्मलेली आणि वाढलेली आहे. तरिही तिने तेलगू चित्रपटांऐवजी हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिले. पण जेव्हा केव्हा तिचा तेलगू चित्रपट आला तेव्हा तेलगू प्रेक्षकांनी तिला अगदी सहज स्वीकारले.

 

टॅग्स :आदिती राव हैदरी