Join us  

'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर ओम राऊतचं देव दर्शन, नेटकरी म्हणाले, "६०० कोटी वाया घालवून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:40 AM

'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर देव दर्शन करणाऱ्या ओम राऊतला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमा १६ जूनला प्रदर्शित झाला होता. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. परंतु, चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स आणि त्यातील पात्रांमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. बहुचर्चित 'आदिपुरुष' सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांना खरा न उतरल्याने बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरला होता. 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक ओम राऊत देव दर्शनाला गेला आहे. 

ओम राऊतने गोव्यातील मंगेशी मंदिर आणि शांतादुर्गा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं. याचे काही फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. "श्री मंगेशी मंदिर आणि श्री शांतादुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मी नेहमी आतुर असतो," असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ओम राऊतच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला...

एका नेटकऱ्याने कमेंट करत "६०० कोटी वाया घालवल्यानंतर मुलं" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "देवावर पुन्हा चित्रपट काढू नकोस", अशी कमेंट केली आहे. "६०० कोटी वाया घालवून माफी मागायला गेले" अशी कमेंटही केली आहे. "आदिपुरुष मध्ये रावणाची वाट लावून टाकली" असंही एकाने म्हटलं आहे. 

‘बाईपण भारी देवा’ने २४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी, केदार शिंदे म्हणाले, “सैराटनंतर...”

दरम्यान, ओम राऊतच्या 'आदिपुरुष' चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत होते. तर या चित्रपटात मराठी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तेजस्विनी पंडित, देवदत्त नागे आणि सोनाली खरे हे मराठी कलाकार आदिपुरुषमध्ये झळकले होते. 

टॅग्स :आदिपुरूषबॉलिवूडप्रभासक्रिती सनॉन