Join us

हा खरंच प्रभास आहे ना?  मुंबईत आला ‘बाहुबली’ ओळखू कुणा येईना; फोटो पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:26 IST

Prabhas : प्रभास कालपरवा मुंबईत दिसला आणि त्याचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला. होय, हा नक्की प्रभासचं ना? असा प्रश्न तर अनेकांना पडला.

ठळक मुद्देप्रभासच्या ‘आदिपुरूष’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर या सिनेमात प्रभाससोबत क्रिती सॅनन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) म्हणजे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. त्याच्या अभिनयावर आणि रूपावर फिदा असणारे असंख्य चाहते आहेत. हाच प्रभास कालपरवा मुंबईत दिसला आणि त्याचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला. होय, हा नक्की प्रभासचं ना? असा प्रश्न तर अनेकांना पडला. नो मेकअप लुकमधील त्याचा फोटो पाहून अनेकांनी त्याला ओळखले  नाही.प्रभास सध्या ‘आदिपुरूष’  (Adipurush) या सिनेमाच्या निमित्ताने मुंबईत आहे. या गाण्याच्या डान्स रिहर्सलसाठी प्रभास, क्रिती सॅनन व सनी सिंग एकत्र आलेत. कारमध्ये बसून डान्स रिहर्सलसाठी जात असतानाचे या तिघांचे फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण या फोटोतील प्रभासला पाहून चाहतेही हैराण झालेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने प्रभासचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांनी हैराण करणाºया प्रतिक्रिया दिल्या. तू खूद वडा पाव बन गया है प्रभास, असे एका चाहत्याने म्हटले.

अन्य एका युजरने, ‘बापरे मी ओळखलेच नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. हा खरंच प्रभास आहे ना? हा स्क्रिनवर फारच वेगळा दिसतो, अशा कमेंट युजर्सने केल्या. काही युजर्सनी तर हा प्रभासचा डुप्लिकेट तर नाही ना? कुछ तो गडबड है दया, अशा मजेशीर कमेंटस केल्यात.

प्रभासच्या ‘आदिपुरूष’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर या सिनेमात प्रभाससोबत क्रिती सॅनन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘तान्हाजी’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. हा सिनेमा पौराणिक कथा रामायणवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रभास श्री रामची भूमिका साकारणार आहेत आणि सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मेगा बजेट सिनेमाची निर्मिती टी-सीरीज करणार आहे.   तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.   

टॅग्स :प्रभास