Join us  

मला लग्न करण्याची भीती वाटते...! शेखर सुमनच्या लेकाने का घेतला धसका?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 2:48 PM

शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन सध्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अध्ययन मायरा मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलेच नाही.

ठळक मुद्देअध्ययन सुमन गेल्या दोन वर्षांपासून मायरा मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण आता दोघांचे ब्रेकअप झालेय.

बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करतोय. पण अद्यापही त्याला मनासारखे यश मिळवता आलेले नाही. अर्थात तरीही अध्ययनचे प्रयत्न सुरु आहेत. हाच अध्ययन सध्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मायरा मिश्रासोबत अध्ययन रिलेशनशिपमध्ये होता. पण हे नाते लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच मायरा व अध्ययनचे ब्रेकअप झाले. आता हे नाते लग्नापर्यंत का पोहोचले नाही तर, त्याला एक कारण आहे.  खुद्द अध्ययनने याचा खुलासा केला आहे. याचे कारण आहे, लग्नाची भीती.होय, अध्ययनला लग्न करण्याची भीती वाटते. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन यावर बोलला.

काय म्हणाला अध्ययन...?मी खोटं बोलणार नाही, पण मी एका मुलीवर खूप प्रेम करायचो. ती मला सोडून गेली आणि मी कोलमडलो होतो. यानंतर दीर्घकाळ मी रिलेशनशिपमध्ये नव्हतो. माझा प्रेमावर विश्वास नाही, असे मी म्हणणार नाही. पण हो, लग्न करायची मला भीती वाटते. मी लग्नाला घाबरतो. कारण माझे बहुतेक मित्र घटस्फोटित आहेत. प्रेम दिसते ते केवळ सोशल मीडियावर. प्रत्यक्षात मी खूप वाईट नात्यातून गेलो आहे. आता मला असे रिलेशनशिप नकोय. अर्थात भविष्यात मी लग्न करणारच नाही, असे नाही. कदाचित मी लग्न करेल सुद्धा. कारण काळासोबत तुमचे विचार बदलतात. मी तरूणांना केवळ इतके सांगू इच्छितो की, बे्रकअपनंतर कोणताही टोकाचा विचार करू नका. अनेकजण ब्रेकअपनंतर ड्रग्ज घेतात, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. याला काहीही अर्थ नाही, असे अध्ययन या मुलाखतीत म्हणाला.

अध्ययन सुमन गेल्या दोन वर्षांपासून मायरा मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण आता दोघांचे ब्रेकअप झालेय. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मायराने या नात्याची कबुली दिली होती. अध्ययन सुमनसोबत नात्यात असल्याचे तिने जगजाहिर केले होते. यानंतर दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते.

जसा विचार केला तसा तो नव्हताच...! अध्ययन सुमन व मायरा मिश्राचे ब्रेकअप

टॅग्स :अध्ययन सुमनशेखर सुमन