Join us  

अधिकारी ब्रदर्सच्या पुढच्या पिढीची 'धीत पतंगे'मधून सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 4:00 PM

धीत पतंगेची कथा ही १९८३ सालातील चार मित्रांवर आधारीत आहे

श्री अधिकारी ब्रदर्सची पुढची पिढी म्हणजेच रवी अधिकारी आणि कैलास अधिकारी  प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. धीत पतंगे या वेब चित्रपटाद्वारे रवी अधिकारीने  दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. 

पदार्पणाबद्दल रवी अधिकारी म्हणाला की, पदार्पण करताना खूप छान वाटतं आहे. आधीपासून घरात काका, वडील यांना मी सिनेइंडस्ट्रीत काम करत असल्याचं पाहत आलो आहे. लहानपणापासून मी पण आपण देखील याच क्षेत्रात काम करायचं ठरविले होते आणि आता ते सत्यात उतरत आहे तर माझ्यासाठी हा खास क्षण आहे. माझे वडील पण दिग्दर्शक होते. लहानपणी वडिलांवर सेटवर जायचो. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. 

डिजिटल माध्यमातून पदार्पण करायचे का ठरविले, या प्रश्नाचं उत्तर देताना रवीने सांगितले की, मी चांगल्या कथेसोबत पदार्पण करायचे ठरविले होते. मी कोणत्या माध्यमातून पदार्पण करायचे हे ठरविले नव्हते. मला धीत पतंगेची स्टोरी चांगली वाटली आणि मी या वेबफिल्मच्या माध्यमातून पदार्पण करायचे ठरविले. 

रवी अधिकारीचा धीत पतंगेचा अनुभव खूप छान होता. पहिलाच चित्रपट होता. खूप काही शिकायला मिळालं. पहिली प्रत्येक गोष्ट स्पेशलच असते, असे त्याने सांगितले.

धीत पतंगेची कथा ही १९८३ सालातील चार मित्रांवर आधारीत आहे. वर्ल्ड कप क्रिकेटची या कथेला पार्श्वभूमी आहे. हे चौघे मुंबईत राहत असतात. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले असतात. त्यांची संस्कृती, भाषा वेगळी आहे. ते चौघे ट्रीपवर निघतात. त्यानंतर ते वर्ल्ड कप क्रिकेट सामना पाहायला जातात. या सामन्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. ही वेब फिल्म हॉटस्टारवर पहायला मिळेल.

टॅग्स :वेबसीरिज