Join us  

​‘बाहुबली’फेम तमन्ना भाटियावर तरूणाने भिरकावला जोडा; धक्कादायक आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 5:30 AM

‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, ३१ वर्षीय तमन्नाला काल  रविवारी हैदराबादेत एका वेगळ्याच प्रसंगाला ...

‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, ३१ वर्षीय तमन्नाला काल  रविवारी हैदराबादेत एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. हैदराबादेतील एका दागिण्यांच्या दुकानांच्या उद्घाटनासाठी ती गेली होती. पण या कार्यक्रमादरम्यान असे काही घडले की, तमन्ना हादरून गेली. होय, एका तरूणाने जोडा काढून तमन्नावर भिरकावला. सुदैवाने या हल्ल्यातून तमन्ना बचावली. हा जोडा दागिण्यांच्या दुकानातील एका कर्मचाºयाला लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्नाला जोडा फेकून मारणारा बीटेकचा विद्यार्थी आहे आणि मुशीराबादचा राहणारा आहे. करीमुल्लाह असे त्याचे नाव आहे. तमन्ना उद्घाटनानंतर दुकानातून बाहेर पडत असताना करीमुल्लाहने तिच्यावर जोडा भिरकावला. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने दिलेली माहिती ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. होय, तमन्नाच्या अलीकडे आलेल्या चित्रपटांवर करीमुल्लाह नाराज होता. या चित्रपटातील तिच्या भूमिका करिमुल्लाहला आवडल्या नाहीत आणि म्हणून संतापून त्याने म्हणे तमन्नावर जोडा भिरकावला.तमन्नाने वयाच्या १५ व्या वर्षी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. ‘चांद सा रोशन चेहरा’ या हिंदी चित्रपटातून तिने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.अर्थात तमन्नाचा हा चित्रपट दणकून आपटला होता. यानंतर तमन्ना काही व्हिडिओ अल्बममध्ये दिसली आणि नंतर तेलगू व तामिळ चित्रपटांकडे वळली. २००५ मध्ये तिने ‘श्री’ या चित्रपटात काम केले. यानंतर एकापाठोपाठ एक तामिळ चित्रपटांनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज तमन्ना साऊथची एक मोठी स्टार म्हणून ओळखली जाते. ALSO READ : ​‘देवसेना’ अन् ‘अवंतिका’ पुन्हा येणार का एकत्र?२०१३ मध्ये   साजिद खानच्या ‘हिम्मतवाला’मधून तमन्नाने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या चित्रपटात तिच्या अपोझिट होता अजय देवगण. ‘हिम्मतवाला’ हा तमन्नाचा बॉलिवूड डेब्यू असल्याचे त्यावेळी साजिद खानने जाहिर केले होते. पण ‘चांद सा रोशन चेहरा’मधून तमन्ना त्यापूर्वीच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावून चुकली होती.