Join us  

प्रभास व श्रद्धा कपूरच्या 'साहो'तील आयटम साँगवर थिरकणार 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 4:46 PM

श्रद्धा आणि प्रभासचा चित्रपट साहोमध्ये आणखीन एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री या चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे.

बाहुबली फेम अभिनेता प्रभास लवकरच अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'साहो'मध्ये झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची संपूर्ण टीम ऑस्ट्रीयामध्ये दिसली होती. या ठिकाणी कोरियोग्राफर वैभवी मर्चंटसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. आता अशी माहिती मिळतेय की श्रद्धा आणि प्रभासचा चित्रपट साहोमध्ये आणखीन एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री या चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून सलमान खानसोबत किकमध्ये झळकलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार प्रभास व श्रद्धा यांचा चित्रपट साहोच्या शूटिंगवेळी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने जॉईन केलं. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे. साहो हा एक अॅक्शनपट आहे. सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. 

नुकतंच या चित्रपटातील पहिले गाणं द सायको सैंयाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या गाण्यावर श्रद्धा आणि प्रभास गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ८ जुलैला पूर्ण गाणं सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार आहे. मात्र या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. इतकेच नाही तर श्रद्धादेखील या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहे.

 साहो सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर सोबत नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

 साहो येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :प्रभासश्रद्धा कपूरजॅकलिन फर्नांडिस