अक्षय कुुमार माझ्या भावनांशी खेळला असा आरोप केला होता या आघाडीच्या अभिनेत्रीने
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:49 IST
आज अक्षय कुमारने पन्नाशीत प्रवेश केला आहे. त्याचा फिटनेस पाहाता तो तरुण अभिनेत्यांनाही लाजवतो. आज अक्षयच्या नावावर अनेक हिट ...
अक्षय कुुमार माझ्या भावनांशी खेळला असा आरोप केला होता या आघाडीच्या अभिनेत्रीने
आज अक्षय कुमारने पन्नाशीत प्रवेश केला आहे. त्याचा फिटनेस पाहाता तो तरुण अभिनेत्यांनाही लाजवतो. आज अक्षयच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान या खानांच्या तिकडीला जोरदार कॉम्पिटेशन देणारा हा अभिनेता आहे. अक्षयने गेल्या काही वर्षांत एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. त्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. आता त्याचा गोल्ड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.अक्षयच्या व्यवसायिक आयुष्याप्रमाणे त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. अक्षयने २००१ मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. त्यांना आरव आणि नितारा अशी दोन मुलं आहेत. ट्विंकलसोबत लग्न करण्याआधी अक्षयची अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत. अक्षय आणि रवीना टंडन यांची प्रेमकथा तर सगळ्यांनाच माहिती आहे. अक्षय आणि रवीना एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील येत होत्या. पण अक्षय आणि रेखाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि रवीना कायमची अक्षयच्या आयुष्यातून निघून गेली.अक्षयचे केवळ रवीनासोबतचे नव्हे तर शिल्पा शेट्टीसोबतचे अफेअर देखील प्रचंड गाजले होते. अक्षय आणि शिल्पा यांचे अफेअर मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सुरू झाले होते. अक्षय शिल्पाशी लग्न करणार असेच तिला वाटत होते. पण त्याचदरम्यान ट्विंकल त्याच्या आयुष्यात आली. धडकन या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना शिल्पाला ही गोष्ट कळली होती. अक्षय आपल्याला धोका देत आहे हे कळल्यावर शिल्पा संपूर्णपणे तुटली होती. तिने २००० ला एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ती मुलाखतीत म्हणाली होती की, हा काळ माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप वाईट होता. माझ्या प्रोफेशनल लाइफ मध्ये सगळे काही सुरळीत सुरू होते. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे मी चांगलीच टेन्शनमध्ये होते. माझ्या आयुष्यात माझ्या जवळच्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून दूर गेल्या आहेत असेच वाटत होते. पण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते. त्याचप्रमाणे मी या दुःखातून देखील बाहेर पडले. अक्षयने माझा वापर केला आणि त्यानंतर त्याच्या मर्जीप्रमाणे तो माझ्या आयुष्यातून निघून गेला. आपला भूतकाळ विसरणे सोपे नसते. पण या सगळ्यातून मी बाहेर पडले याचा मला आज आनंद होत आहे. तो आज मला पूर्णपणे विसरला आहे. तो त्याच्या आयुष्यात रमला आहे. पण भविष्यात त्याच्यासोबत कधीच काम करायचे नाही असे मी ठरवले आहे. Also Read : ऐकलेत का अक्षय कुमार आहे गरोदर