Join us

अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे रातोरात गायब झाली होती ‘ही’ अभिनेत्री; आता असे जगते आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 21:20 IST

जवळपास दीड दशकापर्यंत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये दबदबा निर्माण करणारी एक अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे रातोरात गायब झाली. तिच्या मनात अंडरवर्ल्डची ...

जवळपास दीड दशकापर्यंत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये दबदबा निर्माण करणारी एक अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे रातोरात गायब झाली. तिच्या मनात अंडरवर्ल्डची भीती अशी काही बसली की तिने बॉलिवूडला गुडबाय करीत पळ काढला. ही अभिनेत्री कोण? याविषयीचा कदाचित तुम्हाला अंदाज आला असेल. होय, तुम्ही बरोबर विचार केला आहे. या अभिनेत्रीचे नाव साक्षी शिवानंद असे आहे. साक्षीने ‘क्रोध’ या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी याच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त ‘जंजीर’, ‘जनम कुंडली’, ‘पापा कहते है’ आणि ‘आपको भी पहले कही देखा है’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. साक्षीने ‘जनम कुंडली’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती; मात्र तिचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. त्यानंतर मात्र साक्षीने मागे वळून बघितले नाही. ‘आपको पहले भी कहीं देखा है’ हा चित्रपट साक्षीच्या करिअरचा टर्निंग पॉँइंट राहिला. या चित्रपटानंतर तिने बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलिवूडमध्ये ती स्थिर होत होती; मात्र ती बॉलिवूडमध्ये आपले पाय आणखी भक्कम करणार तोच तिच्यासोबत अंडरवर्ल्डशी संबंधित एक घटना घडली अन् तिला बॉलिवूड सोडावे लागले. याचा खुलासा स्वत:च साक्षीने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत केला होता. तेव्हा साक्षीने म्हटले होते की, ‘जेव्हा मला हे कळाले होते की, मी ज्या चित्रपटात काम करीत आहे, तो चित्रपट अंडरवर्ल्डशी संबंधित आहे तेव्हा मी प्रचंड घाबरली होती.’पुढे बोलताना साक्षीने म्हटले होते की, ‘त्यावेळी मला अनेकांनी सांगितले होते की, बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे खूपच क्लोज कनेक्शन आहे. त्यामुळे मी खूपच घाबरली होती. तसेच भीतीपोटी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला अन् साउथला गेली. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, साक्षीच्या मनात अंडरवर्ल्डची दहशत एवढी निर्माण झाली होती की, तिने तिचा पत्ता आणि ठिकाण कोणालाही सांगितले नव्हते. ज्या चित्रपटात (अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेला चित्रपट) ती काम करीत होती, त्या चित्रपटाचा दिग्दर्शक तिला सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र साक्षीने त्याच्याशी कधीच संपर्क साधला नाही. उलट तिचा संपर्क क्रमांकच बदलून टाकला. साक्षीने जेव्हा बॉलिवूड सोडले होते तेव्हा कोणालाच माहिती नव्हते की, साक्षी कुठे गायब झाली? कोणालाच समजत नव्हते की, साक्षी रातोरात कुठे अंडरग्राउंड झाली असेल? त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, साक्षी कुठे असेल? काय तुम्हाला माहिती आहे की साक्षी कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सध्या साक्षी साउथमध्ये असून, तेथील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. कमीत कमी वेळात साक्षीने साउथमध्ये स्टारडम मिळविले. साक्षीने आतापर्यंत चिरंजीवी, नागार्जुन, बालाकृष्णन आणि मोहन बाबूसारख्या बड्या साउथ स्टार्ससोबत काम केले आहे. आज साक्षीने साउथमध्ये प्रचंड नाव आणि पैसा कमविला आहे. परंतु आजही तिच्या मनात अंडरवर्ल्डविषयी भीती आहे. शिवाय अंडरवर्ल्डमुळे तिला बॉलिवूड सोडावे लागल्याचीही तिच्या मनात खंत आहे.