Join us  

बापरे...! आनंदात नाही तर आजारापासून बचाव करण्यासाठी इंस्टाग्रामवर आली ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 5:37 PM

बॉलिवूडचे असे कित्येक सेलेब्रिटी असे आहेत जे सोशल मीडियावर जास्त सक्रीय नाहीत.

बॉलिवूडचे असे कित्येक सेलेब्रिटी असे आहेत जे सोशल मीडियावर जास्त सक्रीय नाहीत. काही जणांनी तर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सोशल मीडियावर पदार्पण केले आहे. त्या पैकी एक सेलिब्रेटी आहे यंग आणि गॉर्जस सुश्मिता सेन.सुश्मिता सेन चित्रपटांपासून दूर असून सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी आपल्या मुलांसोबत, वर्कआऊट आणि फिरतानाचे फोटो शेअर करत असते.

सुश्मिता सेनने नुकताच खुलासा केला की, तिने बऱ्याच कालावधीनंतर इंस्टाग्रामवर पदार्पण केले होते. नुकताच तिने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एक अशी वेळ आली होती जेव्हा मी खूप आजारी असल्याचे वाटू लागले होते आणि माझ्या डोक्यात खूप विचित्र विचार येऊ लागले होते. या सर्व गोष्टी विसरण्यासाठी मी इंस्टाग्रामवर माझे अकाउंट सुरू केले.

सुश्मिताने सांगितले की, मी खूप आजारी पडले होते आणि माझे केस गळू लागले होते. असे वाटायचे की जणू माझ्या मेंदूने विचार करायचे सोडून दिले आहे. प्रत्येक वेळी एकच विचार यायचा की जर मी मेली तर... त्यावेळी लोकांनी मला ओळखणे बंद केले की मी कोण आहे. त्यानंतर एका रात्री मला विचार आला की मला इंस्टाग्राम वापरून पाहिले पाहिजे. त्यानंतर मी इंस्टाग्रामवर अकाउंट बनवले.

कौतुकास्पद बाब आहे की सध्या सुश्मिताचे इंस्टाग्रामवर जवळपास ४.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच सुश्मिता सध्या तिचा बॉयफ्रेंड रोहमन सोबतच्या अफेयरमुळे चर्चेत असते.

तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर तिचा छोटा भाऊ राजीव सेन लवकरच लग्न करणार आहे.

राजीव मेरे अंगने में मालिकेतील अभिनेत्री चारू असोपासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

टॅग्स :सुश्मिता सेन