दुसऱ्यांदा गर्भवती आहे ही अभिनेत्री, उर्वशी शर्मा नाव बदलून रैना जोशी नाव ठेवत थाटला संसार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी शर्मा ऊर्फ रैना जोशी पुन्हा एकदा गर्भवती आहे. नुकतेच तिच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये रैना यलो आणि लाइट फिरोजी रंगाच्या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
दुसऱ्यांदा गर्भवती आहे ही अभिनेत्री, उर्वशी शर्मा नाव बदलून रैना जोशी नाव ठेवत थाटला संसार!
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी शर्मा ऊर्फ रैना जोशी पुन्हा एकदा गर्भवती आहे. नुकतेच तिच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये रैना यलो आणि लाइट फिरोजी रंगाच्या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. रैनाने उद्योगपती सचिन जोशी यांच्यासोबत २०१२ मध्ये विवाह केला. उर्वशी शर्माने तिने संपूर्ण नाव बदलून रैना जोशी असे ठेवले. दरम्यान, या दाम्पत्याला समायरा नावाची मुलगी असून, तिचा जन्म २१ जानेवारी २०१४ मध्ये झाला. दरम्यान, डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमासाठी परिवारातील सर्व सदस्य तथा जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी टीव्ही अभिनेता शब्बीर अहलुवालिया उपस्थित होता. सध्या रैनाने बॉलिवूडमधून पूर्णपणे एक्झिट घेतली असून, ती संसारात व्यस्त आहे. दरम्यान, रैनाने अब्बास-मस्तान यांच्या २००७ मध्ये आलेल्या ‘नकाब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात तिच्या अपोझिट अक्षय खन्ना आणि बॉबी देओल होते. त्यानंतर रैनाने बाबर (२००९), खट्टामिठा (२०१०), आक्रोश (२०१०) आणि चक्राधार (२०१२) आदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. बॉलिवूडमध्ये मोजक्याच चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री उर्वशी शर्मा ऊर्फ रैना जोशी सध्या संसारात व्यस्त आहे.