Join us  

तुम्ही तर त्या लायकीचेही नाही..! निर्मात्यावर भडकली स्वरा भास्कर, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:52 AM

 होय, स्वरा व निर्माता अशोक पंडित यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीय. दोघांमधील सोशल मीडियावरचे ट्विटर वॉर चांगलेच चर्चेत आहे.

ठळक मुद्देस्वरा भास्कर व अशोक पंडित यांच्यातील ट्विटर वादाची सुरुवात स्वराच्या एका ट्विटनंतर सुरु झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या या स्वभावामुळेच ती जास्त चर्चेत असते. तूर्तास स्वरा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, स्वरा व निर्माता अशोक पंडित यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीय. दोघांमधील सोशल मीडियावरचे ट्विटर वॉर चांगलेच चर्चेत आहे. आता हे वॉर सोशल न राहता ‘पर्सनल’ झालेले पाहायला मिळतेय.होय, हे वॉर सुरु असताना एका क्षणाला स्वरा जाम भडकली आणि तिने अशोक पंडित यांना चांगलेच सुलावले.

 ‘तुमच्या मुलीसोबत काम केलेय, म्हणून तुम्हाला अंकल म्हणत होते. मला ती खूप आवडली. आमच्यात चांगले संबंध तयार झालेत. तुमच्या मुलीमुळे तुम्हाला आदर दिला. पण माझ्यामते, तुम्ही आदराच्या लायकीचेच नाही. हा व्यक्तिगत हल्ला नाही. तुम्ही सतत मला टॅग करता. हे वास्तव आहे पण तुम्हाला तर वास्तवाची अ‍ॅलर्जी आहे,’ असे स्वराने लिहिले.

अशात अशोक पंडितही शांत बसणा-यांपैकी नाहीत. त्यांनीही यावर तिच्याच शब्दांत उत्तर दिले. ‘आंटीजी, योग्य वयात लग्न झाले की, मुलं मोठी होतात. हा तर नशीबाचा भाग आहे. मात्र कुणाचे लग्न होत नसेल वा मुद्दाम करत नसेल तर ती व्यक्ती वयाने लहान आहे, असे मुळीच नाही. माझे संपूर्ण कुटुंबच चांगले आहे,’असे त्यांनी स्वराला डिवचत लिहिले. ते इथेच थांबले नाहीत तर पुढे त्यांनी लिहिले, ‘यांच्यात एक खास गोष्ट आहे. यांच्याकडचे तर्क संपले की, ते दुस-यांच्या कुटुंबाना वादात ओढतात. पण मी माझे खासगी आयुष्य चव्हाट्यावर येऊ देणार नाही,’असेही त्यांनी स्वराला सुनावले.

कशी झाली वादाला सुरुवात

स्वरा भास्कर व अशोक पंडित यांच्यातील ट्विटर वादाची सुरुवात स्वराच्या एका ट्विटनंतर सुरु झाली होती. ‘’तुम्ही दिल्ली वा जवळपासचे मजूर आहात किंवा बिहार वा उत्तर प्रदेशातील आपल्या गावी जाणा-या मजूरांबद्दल जाणता तर हा अर्ज भरा. आमचे मित्र या मजूरांची मदत करतील,’ असे एक ट्विट अलीकडे स्वरा भास्करने केले होते. यावर अशोक पंडित यांनी स्वराला लक्ष्य केले होते. ‘तुम्ही स्वत: कागद दाखवण्याला विरोध केला आणि आता स्वत: दुस-यांना मागत आहात. इतक्या लवकर कुणी कसे बदलू शकते? पण ठीक आहे. देर आए दुरूस्त आए,’असे ट्विट अशोक पंडित यांनी केले होते. अशोक पंडित यांच्या या ट्विटला उत्तर देताना स्वराने त्यांना अशोक अंकल संबोधले होते. ‘अशोक अंकल, तुम्ही सतत मला सायबर स्टॉक का करता? तुमच्या वयाला हे शोभत नाही. स्वत:चा आदर करा. मी एनआरसी-एनपीआरसाठी कागद दाखवण्याच्या विरोधात होते. ट्रेनच्या तिकिटासाठी नाही,’ असे तिने लिहिले होते. तेव्हापासून दोघांमध्ये जुंपली आहे.

टॅग्स :स्वरा भास्कर