Join us

​अभिनेत्रींची अवस्था मोलकरणींपेक्षा वाईट !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 20:06 IST

प्रत्युषा बॅनर्जी या टीव्ही अभिनेत्रींच्या आत्महत्येने टीव्ही इंडस्ट्री ढवळून निघाली असताना, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अभिनय क्षेत्रातील महिलांच्या ...

प्रत्युषा बॅनर्जी या टीव्ही अभिनेत्रींच्या आत्महत्येने टीव्ही इंडस्ट्री ढवळून निघाली असताना, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अभिनय क्षेत्रातील महिलांच्या स्थितीबाबत अतिशय परखड सत्य  बोलून दाखवले आहे. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या मनोरंजन क्षेत्रात महिला कलाकारांना टिकून राहण्यासाठी अनेक संघर्ष करावा लागतो,हाच धागा पकडून महेश भट्ट यांनी एक धाडसी विधान केले आहे. आघाडीच्या बॉलिवूड व टेलिव्हिजन अभिनेत्री सार्वजनिक आयुष्यात महिला सक्षमीकरणाचे कितीही दावे करीत असल्या तरी, खासगी आयुष्यात त्यांची अवस्था मोलकणींपेक्षा वाईट आहे. मनोरंजन विश्वातील व्यक्तिला यश मिळाले म्हणून त्याला तितकेच भावनिक स्वातंत्र्य असेलच असे नाही. हीच खरी शोकांतिका आहे, असे महेश भट्ट एका मुलाखतीत म्हणाले. मी मनोरंजन विश्वास अनेक अभिनेत्री बघितल्या. सार्वजनिक आयुष्यात महिला सक्षमीकरणावर त्या मोठ मोठ्याने बोलतात. पण खासगी आयुष्यात त्यांच्या भावनांवर त्यांच्या पतीचे नियंत्रण असते. मोलकरणींपेक्षाही त्यांची अवस्था वाईट आहे. पुरूष त्यांच्या भावनांशी खेळतात. पण मनोरंजन विश्वातील असुरक्षितता आणि एकटेपणाची भीती यामुळे अभिनेत्री पुरूषी अत्याचार सहन करतात, असे भट्ट म्हणाले.