Join us  

34 मुलींची माता आहे ही अभिनेत्री पण केले दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 3:15 PM

प्रिती अनेक वर्षांपासून शाळेतही आलेली नाही. तिच्या वागण्यामुळे स्कूल मॅनेजमेंटही चांगलेच नाराज झाले  आहे. 

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेता अभिनेत्रींना सामाजिक भान जपत मुलांना दत्तक घेत त्याचे पालकत्व स्विकारले आहे.अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी मुलांना दत्तक घेत त्यांना त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण केले आहेत. याच यादीत डिंम्पल गर्ल  प्रिती झिंटाचाही समावेश आहे. 10 वर्षापुर्वी प्रितीने एक नाही दोन नाही तर तब्बल  34 मुलींना दत्तक घेतले होते. पण वेळ बदलत गेली आणि  प्रितीही आपली जबाबदारी विसरल्याचे समोर येतआ हे. आपल्या या दत्तक घेतलेल्या मुलीकडे प्रितीने दुर्लक्ष केल्याचे माहिती मिळते आहे. ती कधीच त्यांची विचारपूस करायला जात नाही आणि त्यांचा खर्चही देत नाही. उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलच्या संस्थापिका शाइला इत्तेफाम यांनी सांगितल्यानुसार, 34 मुलींचे पालन पोषण आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचन प्रितीने दिले होते. प्रिती अनेक वर्षांपासून शाळेतही आलेली नाही. तिच्या वागण्यामुळे स्कूल मॅनेजमेंटही चांगलेच नाराज झाले  आहे. 

 

प्रितीच्या पर्सनल लाईफची झाली जास्त चर्चा 

प्रितीचे पर्सनल लाईफही बरेच चर्चेत राहिले. यातील सलमान व प्रितीचा वाद चांगलाच गाजला होता. सलमानने आपल्या आवाजात टेप रेकॉर्डिंग करून प्रीतीला ब्लॅकमेल केले होते. यानंतर प्रीतीने सलमानविरोधात केस दाखल केली होती. पोलिस तपासानंतर हे टेप बनावट असल्याचे समोर आले. ही घटना ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटाच्या दरम्यान घडली होती. मात्र, आजदेखील प्रीती आणि सलमान दोघेही चांगले मित्र आहेत. 

प्रितीच्या अफेअरची चर्चाही खूप रंगली. नेस वाडियासोबतचे प्रितीचे रिलेशनशिप जगजाहिर होते. ती आणि नेस वाडिया दोघेही जवळपास चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. पण पुढे हे रिलेशनशिप वेगळ्याच वळणावर गेले.तिने वाडियावर शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. वाडियाने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर त्यांच्या नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. 

 

आयपीएल टीम किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य क्रिकेटर युवराज सिंहसोबतही प्रितीचे नाव जोडले गेले. दोघेही मॅचदरम्यान आणि अनेकदा एकत्र दिसल्याने त्यांच्या अफेअरची चर्चा चांगलीच होती.   दुसरीकडे आॅस्ट्रेलियाचा क्रिकेटर ब्रेट लीशी देखील तिचे अफेअर असल्याची कुजबूजही ऐकू आली होती. २०१६ मध्ये  प्रितीने यूएसमधील तिचा बॉयफ्रेंड जेने गुडइनफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली. आज प्रिती बॉलिवूडच्या पार्ट्याना दिसते. पण तशी ती आपल्या संसारात अधिक आनंदी आहे.