Join us  

Kangana Ranaut डेंग्यूची लागण, अंगात ताप असतानाही करतेय काम, टीम म्हणाली-....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 5:51 PM

Kangana Ranaut Health Alert: कंगनाला डेंग्यू झालेला असतानाही विश्रांती घेण्याऐवजी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या सेटवर काम करण्यात व्यस्त आहे. तिचे सेटवरचे फोटो समोर आले आहेत.

Kangana Ranaut Diagnosed With Dengue:कंगना राणौत (Kangana Ranaut)ही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती केवळ अभिनेत्री म्हणून काम करत नाही तर ती या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. कंगनावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यासाठी तिला चित्रपटाबाबत कोणतीही ढील द्यायची नाही. त्यामुळे डेंग्यू झालेला असतानाही अभिनेत्री विश्रांती घेण्याऐवजी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या सेटवर काम करण्यात व्यस्त आहे. कंगनाच्या प्रोडक्शन मणिकर्णिका फिल्म्सच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती समोर आली आहे.

मणिकर्णिका फिल्म्सच्या टीमने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे कंगनाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना आजारी असूनही काम करताना दिसत आहे. पोस्टच्या एका कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “जेव्हा तुम्हाला डेंग्यू झालेला असता तेव्हा तुमच्या पांढऱ्या रक्त पेशींची संख्या झपाट्याने कमी होते आणि खूप तापही येतो. अशा  अवस्थेतही तुम्ही कामावर आलात तर तो वेडेपणा आहे, पॅशन नाही. 

कंगना सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील त्याचा लूक आधीच व्हायरल झाला आहे. 'इमर्जन्सी'मध्ये कंगनाशिवाय श्रेयस तळपदे आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस आणि क्रांतिकारी नेते जेपी नारायण यांच्या भूमिकेत अनुपमचा लूकही समोर आला आहे.

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटी