Join us

‘या’ अभिनेत्रीने ६२ कोटी रुपयांत विकायला काढले तिचे ड्रिम होम; आलिशान घराचे पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

अभिनेत्री आणि गायिका असलेल्या कॅटी पेरी हिने तिचा हॉलिवूड हिल्स स्थित ड्रिम होम विकायला काढले आहे. तिने तिचे घर मार्केटमध्ये लिस्ट केले असून, त्याची किंमत ६२ कोटी रुपये एवढी ठेवली आहे.

अभिनेत्री आणि गायिका असलेल्या कॅटी पेरी हिने तिचा हॉलिवूड हिल्स स्थित ड्रिम होम विकायला काढले आहे. तिने तिचे घर मार्केटमध्ये लिस्ट केले असून, त्याची किंमत ६२ कोटी रुपये एवढी ठेवली आहे. या घरात ४ बेडरूम आणि ६ बाथरूम आहेत. हे घर लॉस एन्जेलिसमधील एका पॉश एरियात आहे. या घराच्या परिसरात तब्बल दोन एकरात गार्डन आहे. ज्यामध्ये हजारो प्रकारच्या फुलांचे आणि फळांची झाडे आहेत.कॅटी पेरी जवळपास ८१९ कोटी रुपयांची मालकीण आहे. तिने या घरातील प्रत्येक रूम वेगळ्या पद्धतीने डेकोरेट केली आहे.ड्राइंग रूममध्ये मोठमोठे सोफे ठेवण्यात आले आहेत. रूममध्ये मोठमोठे ग्लास विंडो आहेत. ज्यामधून बाहेरचा नजारा बघता येतो.प्रत्येक रूमची भिंत पांढºया रंगाची आहे. त्याशिवाय रूममध्ये ब्राइट रंगाचे कर्टन्स लावलेले आहेत. बेडरूममध्ये फायर प्लेससुद्धा आहे. शिवाय डबल स्टोरी गेस्ट रूमदेखील आहे. या रूममध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत.या घरात एक प्रशस्त अशी एंटरटेन्मेंट रूमदेखील आहे. ज्याठिकाणी चित्रपट बघता येतो. याशिवाय जीम आणि कार पार्क करण्यासाठी एक मोठे गॅरेज आहे. आउटसाइट परिसरात एक मोठा स्विमिंग पूल आहे. याठिकाणी सीटिंग व्यवस्था करण्यात आली आहे.