Join us

​या अभिनेत्रीला वाटते सोनम कपूरचे लग्न व्हावे तिच्या भावासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 20:38 IST

बॉलिवूड दिवा म्हणून ओळख मिळविणारी सोनम कपूर आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या सोनम अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. अशातच एक अभिनेत्री ...

बॉलिवूड दिवा म्हणून ओळख मिळविणारी सोनम कपूर आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या सोनम अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. अशातच एक अभिनेत्री तिला आपल्या भावाच्या पत्नीच्या रुपात पहायला उत्सुक आहे. ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये सोनम कपूर व करिना कपूर लवकरच हजेरी लावणार असून या शोमध्ये या गोष्टीचा उलगडा झाला आहे. क रण जोहरचा ‘कॉफी विद करण’ हा कार्यक्रम बॉलिवूड सेलिब्रेटींच्या अनेक गोष्टीवरून पडदा उचलणारा ठरतो आहे. या कार्यक्रमात प्रेग्नेंसी नंतर करिना कपूर सह सोनम कपूर हजेरी लावणार असून त्यावेळी सोनम कपूरचे लग्न आपल्या भावासोबत व्हावे यासाठी क ोण उत्सुक आहे हे कळणार आहे. सोनम व करिना एकत्र येत असल्याने ‘कॉफी विद करण’चा हा भाग चांगलाच इंटरेस्टिंग असेल यात वादच नाही. या शोमध्ये करण जोहरने सोनमला एक प्रश्न विचारला, ‘कधी तू आपला सह कलाकार रणबीर कपूरला डेट केले आहेस का?’ या प्रश्नाचे उत्तर सोनम देणार यापूर्वीच करिना म्हणाली, ‘माझी बहिण करिष्मा सोनमला आपली वहिणी म्हणून पाहू इच्छिते.’ मात्र यावर सोनमने दिलेले उत्तर मजेदार आहे. सोनम म्हणाली, ‘मी रणबीरला कधीच आनंदी ठेऊ शकणार नाही. आम्ही दोघे केवळ चांगले मित्र म्हणून राहू शकतो.’ आता करिष्मा कपूरची ही इच्छा पूर्ण होणार की नाही हे तर कुणालाच ठाऊक नाही. मात्र सोनमने आपली बाजू चांगलीच सेफ केली आहे. रणबीर कपूर व सोनम कपूर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या सावरियां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला दोघेही एकमेकांना डेट करीत आहेत अशाही बातम्या आल्या होत्या. मात्र आता दोघांत काहीच नाही असे सांगण्यात येते. रणबीरचे नाव दीपिका व कॅटरिनासोबत जोडण्यात आले आहे तर सोनम कपूर आनंद अहुजा या फॅशन व्यवसायिकाला डेट करीत असल्याचे सांगण्यात येते. दोघांनी साखरपुडाही केला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.‘कॉफी विद करण’च्या या भागात सोनमसह करिना कपूरच्या जीवनातील रहस्यांवरून पडदा उचलला जाणार असल्याचे सांगण्यात येते. रेहा कपूर दिग्दर्शित करीत असलेल्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात सोनम कपूर व करिना कपूर एकत्र दिसणार आहेत, त्यांच्यासोबत स्वरा भास्करची देखील महत्त्वाची भूमिका आहे.