Join us  

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन; चित्रपटसृष्टीमध्ये व्यक्त केली हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 6:54 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास ...

मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक जण समाजमाध्यमांवर पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत.

सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कूपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सिद्धार्थच्या निधनाची वार्ता ऐकून बॉलिवूडमधील अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.

कारकीर्द

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने ‘बाबुल का आंगन छूटे’ या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.

टॅग्स :बॉलिवूड