Join us  

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेता साहिल खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाला-मलाही काढून टाकले होते बऱ्याच सिनेमातून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 5:36 PM

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता 'स्टाइल' फेम अभिनेता साहिल खानने इंडस्ट्रीतील त्याला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सोशल मीडियावर सांगितले. बॉलिवूडमधील घराणेशाही कशी चालते आणि बाहेरुन आलेल्यांवर कसा अन्याय होतो, यावर सध्या काही कलाकार उघडपणे बोलताना दिसत आहेत. अभिनेत्री कंगना रनौत, प्रकाश राज यांनी नेपोटिझमवर भाष्य केल्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.सुशांत सिंग राजपूतला सहा चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते आणि म्हणून त्याने टोकाचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे. याचाच संदर्भ देत 'स्टाइल' चित्रपटातील अभिनेता साहिल खानने देखील एका अभिनेत्यावर आरोप केले आहेत. हा अभिनेता कोण हे त्याने स्पष्टपणे सांगितले नसले तरी त्याच्या बोलण्यावरून तो अभिनेता सलमान खान किंवा शाहरुख खान यांच्यापैकी एकावर निशाणा साधल्याचे जाणवते.  पोस्टसोबत त्याने स्टारडस्ट या मासिकावर सलमान खान व शाहरुख खानसोबत छापलेला त्याचा फोटोही शेअर केला आहे.  

'फार कमी लोकांसोबत असे होते की त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांचा फोटो दोन मोठ्या अभिनेत्यांसोबत एका मोठ्या मासिकाच्या मुखपृष्ठावर छापला जातो. मात्र त्या दोन मोठ्या अभिनेत्यांपैकी एकाला या गोष्टीचे फार वाईट वाटते. मी तर कमजोर होतो. त्यांचा फॅन होतो. तरीही ते मला बऱ्याचदा साईड रोल्ससाठी बोलवायचे. टीव्ही शोजसाठी बोलवायचे. नंतर तर ते मला चित्रपटातून काढून टाकायला लागले. नाव मोठे व दर्शन खोटे. ओळखलं का तुम्ही? आता मला त्यांचा काहीच फरक पडत नाही,  असे त्याने सांगितले.

सुशांत सिंग राजपूतने त्यांचा खरा चेहरा जगाला दाखवला आहे. यावरून समजते की ही लोक नव्या चेहऱ्यांना किती घाबरतात. वीस वर्षात जॉन अब्राहम सोडले तर कोणीच नवीन इंडस्ट्रीमध्ये स्टार झाला नाही. कारण कोणी येऊच देत नाही नवीन लोकांना. फक्त स्टार्सच्या मुलांनाच काम मिळते.' अशी पोस्ट साहीलने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत