Join us  

पूर्व परवानगी शिवाय बळजबरीने किस केले होते या अभिनेत्याने, निर्मात्यांनाही मागावी लागली होती माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 3:22 PM

या सिनेमात काजलला असा सीन द्यावा लागणार असल्याची जराही कल्पना देण्यात आली नव्हती. शूटिंग दरम्यान अचानक रणदीप हुड्डाने तिला किस केले होते.

बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. सिनेमात असे सीन शूट करण्याआधी कलाकारांनाही या गोष्टीची कल्पना दिली जाते. 'दो लफ्जों की कहानी' सिनेमात काजल अग्रवाल आणि रणदीप हुड्डा  या दोघांवर एक लिप- लॉक सीन शूट होणार होता.

रिपोर्टनुसार या सिनेमात काजलला असा सीन द्यावा लागणार असल्याची जराही कल्पना देण्यात आली नव्हती. शूटिंग दरम्यान अचानक रणदीप हुड्डाने तिला किस केले.मात्र काजलच्या पूर्व परवानगी शिवाय सह कलाकाराने असे वागणे तिला खटकले. त्यावेळी यांवर खूप वादही झाला होता. अखेरीस निर्मात्याच्या पुढाकारानंतर काजल सिनेमात काम करण्यास पुन्हा तयार झाली होती. बॉलिवूडसह ती तामिळ आणि तेलुगू सिनेमातही झळकते.

काजलला भेटण्यासाठी जबरा फॅनचा असा खटाटोप !

तामिळनाडूच्या रामानाथपूरम येथे राहणा-या या चाहत्याला काजल अग्रवालला भेटायचे होते. यासाठी तो काहीही करायला तयार होता.याचदरम्यान त्याला एका वेबसाईटची माहिती मिळाली. आम्ही तुमची काजल अग्रवालशी भेट घडवू, असा दावा या वेबसाईटवर करण्यात आला होता. या व्यक्तिने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, वेबपेज मेकर्सशी संपर्क साधला. आधी या वेबसाईटने संबंधित व्यक्तिला 50 हजार रूपये व पर्सनल डिटेल्स मागवले. काजलला भेटायच्या ओढीने या चाहत्याने लगेच 50 हजार रूपये आणि आपला काही अतिशय खासगी डाटा या वेबसाईटला दिला. यानंतर वेळोवळी या चाहत्याला पैशाची मागणी करण्यात आली आणि त्याने ती पूर्ण केली. पण इतके करूनही काजलशी मात्र त्याची भेट झाली नाही. अखेर आपण गंडवलो गेल्याचे या चाहत्याच्या लक्षात आले आणि तो भानावर आला.

हा प्रकार इथेच थांबला नाही तर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चाहत्याने संबंधित वेबसाईटला पैसे देण्यास नकार दिला. यावर वेबपेज मेकर्सनी त्याचे पर्सनल डिटेल्स व खासगी फोटो लीक करण्याची धमकी दिली. तोपर्यंत हा चाहता 60 लाख रूपयांनी फसवला गेला होता.

टॅग्स :रणदीप हुडाकाजल अग्रवाल