Join us  

चित्रपट अभिनेते जवाहर कौल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 7:46 PM

चित्रपट अभिनेते आणि निर्माते जवाहर कौल यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने आणि अल्पशा आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देजवाहर कौल यांनी पहली झलक (1955), अदालत(1958), पापी(1977) यांच्यासह अनेक चित्रपटात अभिनय केला होता. तसेच कठपुतली या चित्रपटात अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या सोबत त्यांनी साकारलेली भूमिका खूप गाजली होती.

चित्रपट अभिनेते आणि निर्माते जवाहर कौल यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने आणि अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. वर्सोवा यारी रोड येथील चिल्ड्रन वेलफेअर शाळेचे प्राचार्य आणि शिक्षण तज्ज्ञ अजय कौल यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात  पूत्र, तीन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जवाहर कौल यांनी पहली झलक (1955), अदालत(1958), पापी(1977) यांच्यासह अनेक चित्रपटात अभिनय केला होता. तसेच कठपुतली या चित्रपटात अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या सोबत त्यांनी साकारलेली भूमिका खूप गाजली होती. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते. प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

आज सायंकाळी पाच वाजता चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या लगत असलेल्या निर्माण कुटीर सोसायटीतील निवास स्थानापासून त्यांची शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा निघाली. सायंकाळी 5.40 मिनिटांनी वेसावे स्मशानभूमीत पूत्र अजय कौल यांनी त्यांना मुखाग्नी दिला. येत्या गुरुवारी दि,18 रोजी सायंकाळी 5 ते 6 या दरम्यान चिल्ड्रन वेलफेअर शाळेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान जवाहर कौल यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपट, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्राचार्य अजय कौल आणि त्यांच्या कुटुंबियांचे भेट देऊन सांत्वन केले.

टॅग्स :बॉलिवूड