Join us  

डेविड आणि वरूण धवन यांच्यासोबत आगामी सिनेमात काम करणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:53 PM

दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा वरूण धवनने अभिनयात आणि मोठा मुलगा रोहित धवन दिग्दर्शनात आपले नाव कमावत आहे. या दोघांनी आपल्या करियरमध्ये चांगले काम करून प्रशंसा मिळवली आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार तिन्ही धवन एकत्र येऊन एका चित्रपटात काम करणार आहे. हे तिघे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. 

ठळक मुद्देडेविड धवन, वरूण व रोहित एकत्र येणार चित्रपटासाठीवरूण धवन सोबत दिसणार सारा अली खान

बॉलिवूडचे दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा वरूण धवनने अभिनयात आणि मोठा मुलगा रोहित धवन दिग्दर्शनात आपले नाव कमावत आहे. या दोघांनी आपल्या करियरमध्ये चांगले काम करून प्रशंसा मिळवली आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार तिन्ही धवन एकत्र येऊन एका चित्रपटात काम करणार आहे. हे तिघे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डेविड धवनला आपले नंबर वन सीरिज पुन्हा जीवित करायचे आहेत. यावेळेस ते आपल्या चित्रपटाच्या सीरिजमध्ये वरूण धवनला मुख्य भूमिका देणार आहेत. तर रोहित धवन या सिनेमाची निर्मिती करणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात वरूणसोबत मुख्य भूमिकेसाठी नायिकेचीदेखील निवड केली आहे. ही अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या सिनेमात सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची वर्णी लागली आहे. पहिल्यांदाच वरूण धवन व सारा अली खान एकत्र काम करताना रुपेरी पडद्यावर दिसतील. साराला सध्याच्या पिढीतील अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळते आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यात ती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. त्यानंतर ती अभिषेक कपूरच्या केदारनाथ चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.वरूण धवन आपल्या वडीलांसोबत तिसऱ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. वरूणने डेविड धवन यांच्यासोबत मैं तेरा हिरो व जुडवा 2 सिनेमात काम केले आहे आणि या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता तिन्ही धवन कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. तसेच वरूण व साराची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ पाडेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

टॅग्स :वरूण धवनसारा अली खान