Join us  

चिरंजीवी सरजाची पत्नी आहे गर्भवती, पतीच्या निधनाची बातमी कळल्यावर रडून रडून झालीय वाईट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 2:15 PM

चिरंजीवी यांचे लग्न अभिनेत्री मेघना राजसोबत झाले असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षं झाले आहेत.

ठळक मुद्देचिरंजीवी यांचे लग्न अभिनेत्री मेघना राजसोबत झाले असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षं झाले आहेत. मेघना ही गरोदर असून पतीच्या निधनाची बातमी कळल्यानंतर रडून रडून तिची अतिशय वाईट अवस्था झाली आहे.

प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं ७ जूनला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी केवळ वयाच्या ३९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे शनिवारी बंगळूरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चिरंजीवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनसाठी त्यांच्या घरी आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार त्यांच्या फार्म हाऊसमध्येच करण्यात आले. त्यांचे लग्न अभिनेत्री मेघना राजसोबत झाले असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षं झाले आहेत. मेघना ही गरोदर असून पतीच्या निधनाची बातमी कळल्यानंतर रडून रडून तिची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. २ मे २०१८ ला मेघना आणि चिरंजीवी यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. मेघना आणि चिरंजीवी हे लग्नाच्या १० वर्षं आधीपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी अगदी जवळचे नातेवाईक आाणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले होते. 

चिरंजीवी यांनी २००९ मध्ये वायूपुत्र या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी २२ कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. यश, शिवराज कुमार, दर्शन, श्रीमुरली, अभिषेक अंबरीश यांसारख्या दक्षिणेतील कलाकारांनी चिरंजीवीच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले तर मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी सोशल मीडियाद्वारे चिरंजीवी यांना श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :हृदयविकाराचा झटका