Join us

बॉलिवूडमधून अचानक गायब झाली ‘ही’ अभिनेत्री ! तिन्ही ‘खान’ला ठरवले जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 10:12 IST

‘खून भरी मांग’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री सोनू वालिया आज कदाचित तुमच्या आमच्या लक्षातही नाही. काही चित्रपटात काम केल्यानंतर ...

‘खून भरी मांग’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री सोनू वालिया आज कदाचित तुमच्या आमच्या लक्षातही नाही. काही चित्रपटात काम केल्यानंतर सोनूने अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. आज सोनू वालिया हे नाव आठवण्याचे कारण म्हणजे, आज (१९ फेबु्रवारी)   सोनूचा वाढदिवस.सोनू बॉलिवूडमधून अचानक का गायब झाली, यामागे खूप रोचक स्टोरी आहे. बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’मुळे सोनूने बॉलिवूडला रामराम ठोकला, हे तुम्हाला सांगूनही खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द सोनूनेच एका मुलाखतीत हे कारण स्पष्ट केले होते.बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’मुळे मला काम मिळणे बंद झाले आणि मी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे सोनूने सांगितले होते. याचे कारण म्हणजे, सोनूची उंची. होय, बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’पेक्षा सोनूची उंची बरीच होती. सोनूच्या मते, त्या काळात उंच मुलींना फार चित्रपट मिळत नसत.सोनूने १९८५ मध्ये ‘मिस इंडिया’ किताब जिंकला. यानंतर लगेच बॉलिवूडच्या आॅफर्स तिला मिळायला लागल्या. १९८८ मध्ये ‘आकर्षण’ या चित्रपटाद्वारे सोनूने बॉलिवूड डेब्यू केला.  या चित्रपटात एका तलावाकाठी सोनूवर सेक्स सीन चित्रीत केला गेला आणि सगळीकडे खळबळ माजली. त्या काळात इतके हॉट दृश्य देण्यास नट्या धजावत नसत. पण सोनूने इतके बोल्ड दृश्य देण्याची हिंमत दाखवली आणि  एका रात्रीत ती चर्चेत आली.यानंतर राकेश रोशन यांनी सोनूला ‘खून भरी मांग’ या चित्रपटासाठी साईन केले. हा चित्रपट सोनूच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. यातील भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही तिने जिंकला. यापश्चात ‘महादेव’,‘क्लर्क’,‘महासंग्राम’,‘हातिमताई’,‘तेजा’,‘नंबरी आदमी’,‘प्रतिकार’, ‘दिल आश्ना है’ अशा डझनावर चित्रपटात सोनू दिसली. पण ‘खून भरी मांग’ सारखी जादू तिला दाखवता आली नाही. २००८ मध्ये ‘जय मां शेरावाली’ हा तिचा शेवटचा चित्रपट.‘मिस इंडिया’ बनण्याआधीपासून सोनू मॉडेलिंग करत होती. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर तिने हॉटेल मालक सूर्य प्रकाश याच्याशी संसार थाटला. काही वर्षात सूर्य प्रकाश यांचे निधन झाले. यानंतर सोनूने अमेरिकेत राहणारे निर्माते प्रताप सिंहसोबत लग्न केले. दोघांचीही एक मुलगी आहे. सध्या सोनू मुंबईत राहते. अलीकडे एका व्यक्तिविरोधात अश्लिल मॅसेज व फोटो पाठवण्याची तक्रार दाखल करून ती चर्चेत आली होती.