Join us  

KRK रूग्णालयात दाखल; काल रात्री मुंबई विमानतळावरून करण्यात आली होती अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 6:28 PM

KRK Admitted in Hospital:आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अभिनेता कमाल खानला अटक करण्यात आलीय.

KRK Admitted in Hospital: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चित्रपट अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान (KRK) याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्याने त्याला मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटकेनंतर केआरकेला पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले होते. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विमानतळावरुन करण्यात आली अटक एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, दुबईहून आल्यावर केआरकेला सोमवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. पोलिसांनी कमाल आर खानला बोरिवली येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले आणि चौकशीसाठी त्याला चार दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

काय आहे प्रकरण?कमाल आर खान याला २०२० मध्ये नोंद झालेल्या एका गुन्ह्यामध्ये ही अटक करण्यात आली आहे. कमाल खानने सोशल मीडियावरून धर्माबाबत वादग्रस्त ट्विट केल्याच्या त्याच्यावर आरोप आहे.

कमाल खान हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. वादग्रस्त ट्विटमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. कमाल खान अगदी बिनधास्तपणे बॉलीवूडमधील अनेक बड्या अभिनेत्यांवर टीका करत असतो. अगदी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यावरही त्याने टीका केलेली आहे. 

टॅग्स :कमाल आर खानबॉलिवूड