Join us  

फ्लॉफ सिनेमे दिल्यानंतर आहे, कोट्यावधीचा मालिक, जाणून घ्या 'तो' सध्या काय करतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 6:00 AM

उदयसोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्व्हस ब्रेकडाऊनमुळे नर्गिस अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. असाच एक अभिनेता म्हणजे उदय चोप्रा.

मोहब्बतें या सिनेमातून  उदय चोप्राने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. करिअरच्या सुरुवातीला पिळदार बॉडी, हँडसम दिसणारा उदयच्या लूकमध्ये काळानुसार प्रचंड बदल झाला आहे. ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो सिनेमात झळकला नाही.

मध्ये तो डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या आल्या होत्या. यश चोप्राचा मुलगा आणि आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरसह अनेक सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे. उदयने आतापर्यंत 'मेरे यार की शादी है', 'मुझसे दोस्ती करोगे', 'सुपारी', 'कल हो ना हो', 'चरस', 'धूम', 'हम तुम', 'नील एंड निकी', 'धूम 2', 'दिल बोले हडिप्पा', 'प्यार इम्पॉसिबल' आणि 'धूम 3' यासारखे केवळ १2 सिनेमे केले आहेत.

उदय चोप्रा 7 वर्षांपासून कोणत्याही सिनेमात झळकला नाही म्हणून आजकाल तो सध्या काय करतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आता उदय चोप्रा निर्माता बनला आहे. २०१४मध्ये त्याने 'ग्रेस ऑफ मोनाको' आणि 'द लॉन्गेस्ट वीक' या दोन सिनेमांची निर्मिती केली आहे. याशिवाय तो आई पामेला चोप्रा आणि भाऊ आदित्य चोप्रा यांच्यासह यशराज फिल्म्सचा सीईओ म्हणून कार्यरत आहे.

अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत उदय चोप्राचे अफेअर असल्याच्या बातम्या होत्या. सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचीही चर्चा होती. उदयसोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्व्हस ब्रेकडाऊनमुळे नर्गिस अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

अर्थात नर्गिसने या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. उदयने तर यावर एक आॅफिशिअल स्टेटमेंटही जारी केले होते. नर्गिस आणि मी केवळ चांगले मित्र आहोत. आम्हा दोघांच्या नात्याला मीडियाने रिलेशनशिपचे नाव देऊन मोकळे झाले आहेत.पण यात काहीही सत्य नाही, असे सांगत उठलेल्या अफवांवर पूर्णविराम दिला होता. 

टॅग्स :उदय चोप्रानर्गिस फाकरी