अभिषेक म्हणाला, ‘ऐश दिसतेय स्टनिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 18:11 IST
पतीने पत्नीचे कौतुक केले तर पत्नीला ते आवडतेच. मग याला ऐश्वर्या रॉय बच्चन तरी कशी अपवाद ठरू शकेल? नाही ...
अभिषेक म्हणाला, ‘ऐश दिसतेय स्टनिंग’
पतीने पत्नीचे कौतुक केले तर पत्नीला ते आवडतेच. मग याला ऐश्वर्या रॉय बच्चन तरी कशी अपवाद ठरू शकेल? नाही ना. ज्युनियर बच्चन अभिषेकने ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मधील ऐश्वर्याचा स्टनिंग लुक पाहिला अन् तो पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या प्रेमातच पडला. ‘ऐ दिल हैं मुश्किल’ अनेक कारणांमुळे वादाच्या भोवºयात अडकला होता. चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा असलेला समावेश, रणबीर-ऐश्वर्याचे इंटिमेट सीन्स, अक्षेपार्ह डायलॉग्ज यांच्यामुळे हा चित्रपट सतत चर्चेत होता. मात्र, तब्बल पाच वर्षांनंतर कमबॅक केलेल्या आपल्या पत्नीचा हॉट लुक पाहून अभिषेक मात्र चपापलाच. तिचे कौतुक करताना तो म्हणाला,‘मी माझ्या फुटबॉल टीमसोबत सध्या फिरतीवर असल्याने चित्रपट पाहू शकलेलो नाहीये. येत्या आठवड्यात मी ‘ऐ दिल...’ नक्की पाहीन. मी करण जोहर आणि त्याच्या टीमसाठी खुप खुश आहे. चित्रपट नक्कीच चांगला बिझनेस करेल असा माझा विश्वास आहे.’ नुकताच अभिषेक बच्चन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या फॅ शन शो येथे उपस्थित होता. त्याची बहीण श्वेता नंदा ही याठिकाणी रॅम्पवॉक करत होती. येथे अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन हे देखील उपस्थित होते.