अभिषेक घाबरतो ऐश्वर्याला...कोण म्हणे, पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 22:08 IST
एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अभिषेक ऐश्वर्याला कसा घाबरतो, हे अक्षय व रितेशने सांगितले.
अभिषेक घाबरतो ऐश्वर्याला...कोण म्हणे, पाहाच!!
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे बॉलिवूडमधील कूलेस्ट कपल आहे. ‘हाऊसफुल ३’च्या प्रमोशनमध्ये अभिषेक सध्या बिझी आहे. साहजिकच अभिषेकचे को-स्टार अक्षय कुमार आणि रितेश देशमुखही त्याच्यासोबत आहे. अलीकडे अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अभिषेक ऐश्वर्याला कसा घाबरतो, हे अक्षय व रितेशने सांगितले. सेटवर कोण अधिक खायचं आणि सर्वाधिक रिटेक कोणी घेतले, असे विचारल्यावर रितेश व अक्षय दोघांनीही अभिषेकचे नाव घेतले. पत्नीला सर्वाधिक कोण घाबरतो, असे विचारल्यावरही या दोघांनी अभिषेककडेच बोट दाखवले. अर्थात हा सर्व गमतीचा मामला..हा मजेशीर व्हिडिओ तुम्हीही बघा आणि एन्जॉय करा...