अभिषेकने केला खुलासा; असे केले होते ऐशला प्रपोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 20:32 IST
बॉलिवूड सेलिब्रेटी ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला आता १० वर्षे होणार आहेत. मात्र अभिषेक याने ऐश्वर्याला कसे ...
अभिषेकने केला खुलासा; असे केले होते ऐशला प्रपोझ
बॉलिवूड सेलिब्रेटी ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला आता १० वर्षे होणार आहेत. मात्र अभिषेक याने ऐश्वर्याला कसे प्रपोज केले होते याचा खुलासा झाला आहे. खुद्द अभिषेक बच्चनने ट्विट करीत ही गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सुमारे एका दशकापूर्वी २००७ साली ऐश्वर्याने अभिषेकला होकार दिला होता. अभिषेक बच्चनने शुक्रवारी रात्री ट्विट क रून सांगितले, ‘‘ १० वर्षांपूर्वी न्यूयॉकमधील एका थंड बालकनीमध्ये ती हो म्हणाली होती.’’ अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी लग्नापूर्वी अनेक चित्रपटात भूमिका केल्या होत्या. दोघेही सर्वप्रथम ‘ढाई अक्षर प्रेम के’ व ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात दिसले होते. यशराज बॅनरचा ‘बंटी और बबली’ या चित्रपटात अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्याने एक गाणे केल्यावर दोघांत जवळीक वाढत आहे अशा बातम्या आल्या होत्या. मनीरत्नम दिग्दर्शित ‘गुरू’ हा चित्रपटाच्यावेळी देखील दोघांत काहीतरी असावे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. ‘गुरू’चा प्रीमिअर शो टोराँटोमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांनी हजेरी लावली होती. येथून परत आल्यावर न्यूयार्कमध्ये अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला लग्नासाठी प्रपोज केले होते. अभिषेक बच्चनने के लेल्या ट्विटनुसार त्याचवेळी ऐश्वर्याने होकार दिला होता. यानंतर दोघांनी २००७ साली लग्न केले. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या यांना आराध्या नावाची गोंडस मुलगी आहे. नुकतेच आराध्या व आमिर खानचा मुलगा आझाद यांनी एकत्र डान्स केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ऐश्वर्या राय हिची प्रमुख भूमिका असलेला ‘सरबजीत’ व सुशांत सिंग राजपूतचा ‘एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट आॅस्कर अवॉर्डमध्ये विदेशी भाषांच्या चित्रपटांच्या श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.