Join us  

हर्षद मेहतावर आधारित अभिषेक बच्चनचा 'बिग बुल', 'स्कॅम १९९२'चे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 3:56 PM

अभिषेक बच्चनने ‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज पाहून त्याचे कौतूक सोशल मीडियावर केले आहे.

हर्षद मेहता या स्टॉक ब्रोकरवर बनलेली ‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झाली आणि लोकांना आवडली. त्यानंतर आता हर्षद मेहतावर बिग बुल हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन दिसणार आहे. अभिषेक बच्चनने ‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज पाहून त्याचे कौतूक सोशल मीडियावर केले आहे.

अभिषेक बच्चनने ट्विट केले की, प्रतिक गांधी, श्रेया धन्वंतरी, हेमंत खेर, चिराग व्होरा, जय उपाध्यय, अंजली बरोट, के.के. रैना जी, रजत कपूर यांचे खूप कौतूक. फैजल रशीदला पाहून खूप आनंद झाला. विशेष म्हणजे निखिल द्विवेदी आणि शादाब खान यांना पुन्हा स्क्रीनवर एक्टिंग करताना पाहून आनंद झाला. 

तसेच अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर लिहिले की, स्कॅम १९९२ पाहिला. हंसल मेहता आणि संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन. खूप चांगला अभ्यास, चित्रण, निर्मिती आणि अभिनय. सर्व कलाकार अप्रतिम. 

अभिषेक बच्चनच्या द बिग बुल चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटीने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगणने केली आहे. द बिग बुल सिनेमाची कथा १९९० ते २००० दरम्यान भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर आधारीत आहे. अजय देवगन आणि अभिषेक बच्चन यांनी याआधी २०१२ साली प्रदर्शित झालेल्या बोल बच्चन या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा एक कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहीत शेट्टी याने केले होते.

‘द बिग बुल’ या चित्रपटाच्या निमित्ताने आत पुन्हा एकदा अभिषेक व अजय देवगन एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन सोबत इलियाना डिक्रुझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चनहर्षद मेहतास्कॅम १९९२