अखेर अभिषेक बच्चनच्या हाताला मिळाले काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 15:52 IST
उण्यापु-या दीड वर्षांपासून अभिषेक बच्चन कुठल्याही चित्रपटात दिसलेला नाही. वडिल अमिताभ बच्चन यांच्याकडे एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांची रांग ...
अखेर अभिषेक बच्चनच्या हाताला मिळाले काम!
उण्यापु-या दीड वर्षांपासून अभिषेक बच्चन कुठल्याही चित्रपटात दिसलेला नाही. वडिल अमिताभ बच्चन यांच्याकडे एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांची रांग लागलेली असताना अभिषेककडे मात्र काम नाहीय. त्यामुळे त्याच्या करिअरची नौका बुडणार की काय, अशी बातमी त्याच्या चाहत्यांना वाटू लागली आहे. पण थांबा...कदाचित नौका इतक्यात तरी डुंबणार नाही. होय, कारण अभिषेकला एक चित्रपट मिळाला आहे. होय, अभिषेक लवकरच एक रॉ एजन्टच्या भूमिकेत दिसणार आहे.ताज्या बातमीनुसार, अभिषेकने ‘रॉ’ चित्रपट साईन केला आहे. यात तो रॉ एजन्टच्या भूमिकेत दिसेल. बंटी वालियाची पत्नी वानेसा वालिया हा चित्रपट प्रोड्यूस करते आहे. बंटी वालिया व अभिषेक जुने मित्र आहेत. त्याने अभिषेकला स्क्रिप्ट ऐकवली. अभिषेकला ती आवडली आणि त्याने हा चित्रपट साईन केला. यापूर्वी या चित्रपटासाठी सुशांत सिंहचे नाव फायनल झाले होते. पण सुशांतच्या तारखांचा मेळ जमत नसल्याने ऐनवेळी त्याने या चित्रपटास म्हणे नकार दिला. सुशांत सध्या ‘केदारनाथ’मध्ये बिझी आहे. त्यामुळे सुशांत आऊट झाला अन् अभिषेक इन झाला.अभिषेकचा हा नवा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित असल्याचे कळते. यात अभिषेक जबरदस्त अॅक्शन करताना दिसेल. यासाठी अभिषेकला बॉडी फिट घेण्याचीही गरज पडू शकते. एकंदर काय तर अभिषेक ब-याच महिन्यांनंतर काहीतरी करताना दिसेल.ALSO READ: -म्हणून अभिषेक बच्चनची हिरोईन बनण्यास प्रियांका चोप्राने दिला नकार?मध्यंतरी अभिषेकने जे पी दत्ता यांचा ‘पलटन’ हा चित्रपट नाकारल्याची बातमी आली होती. यामागचे कारण अर्थात गुलदस्त्यात होते. सूत्रांच्या मते, ‘पलटन’ नाकारण्यामागचे ‘रॉ’ हेच कारण आहे. सूत्रांचे खरे मानात तर अभिषेकने ‘पलटन’ आॅफिशिअल साईन केला नव्हता. त्यामुळे ‘रॉ’ आल्यावर अभिषेकने आधी त्याला होकार दिला. अभिषेक अखेरचा ‘हाऊसफुल3’मध्ये दिसला होता. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून अभिषेकचा एकही चित्रपट आलेला नाही. आता हा आगामी चित्रपट तरी अभिषेकसाठी ‘लाभाचा’ लागो अन् त्याचा नौका पार होवो, हीच कामना.