Join us  

पाहा, ‘The Big Bull’चा जबरदस्त ट्रेलर! अभिषेक बच्चनचा हटके अवतार पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 12:51 PM

The Big Bull Trailer Out : 3 मिनिट 8 सेकंदाच्या या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात होते, ती धमाकेदार डायलॉगने.

ठळक मुद्दे अजय देवगण, आनंद पंडित, कुमार मंगत पाठक आणि विक्रांत शर्मा यांची निर्मिती असलेला हा सिनेमा डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

हर्षद मेहता घोटाळ्यावर बनलेली ‘स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज तुम्ही पाहिली असेलच. आता याच विषयावरचा सिनेमा पाहण्यासाठी सज्ज व्हा. हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा सिनेमा येत्या 8 एप्रिलला प्रदर्शित होतोय. त्याआधी या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय.3 मिनिट 8 सेकंदाच्या या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात होते, ती धमाकेदार डायलॉगने.  इस देश मैं हम कुछ भी कर सकते है..., या संवादाने ट्रेलर सुरु होतो आणि पाठोपाठ अभिषेक बच्चन, इलियाना डिक्रूज आणि सौरभ शुक्ला यांची एन्ट्री होते. अभिषेकचा सिनेमातील लूक जबरदस्त आहे. यात  इलियाना डिक्रूज एका महिला पत्रकाराची भूमिकेत दिसते सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण ते भारतातील सर्वात मोठा स्टॉक इन्व्हेस्टर होण्यापर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवण्याच आला आहे. महेश मांजरेकर, राम कपूर, सुप्रिया पाठक, निकिता दत्ता, सोहम शाह यांचीही झलक ट्रेलरमध्ये दिसते.

‘द बिग बुल’ हा सिनेमा कूकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगण, आनंद पंडित, कुमार मंगत पाठक आणि विक्रांत शर्मा यांची निर्मिती असलेला हा सिनेमा डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याच विषयावरची ‘स्कॅम 1992’ ही वेबसीरिज गतवर्षी आली होती. ही वेबसीरिज तुफान गाजली होती. साहजिकच या वेबसीरिजसोबत ‘द बिग बुल’ची तुलना होणार आहे. या तुलनेचा निष्कर्ष सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. सध्या तरी ‘द बिग बुल’चा ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय. 

टॅग्स :अभिषेक बच्चन