Join us  

'आरक्षण' फेम अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन, अभिनेत्याशिवाय होते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 11:08 AM

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी देखील होते.

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी देखील होते. 

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना. 

भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी २००३ साली आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांनी पेज ३, रॉकेट सिंगः सेल्समॅन ऑफ द ईअर, आरक्षण, मर्डर २,  २ स्टेट्स आणि द गाजी अटॅक या सारख्या चित्रपटात कामही केले आहे. 

चित्रपटांशिवाय त्यांनी  दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है आणि २४ या मालिकेतही काम केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या