Join us

​आमिरने इंजिनीअर व्हायचे होते पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 20:23 IST

आमिर खानने बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटात रचनात्मक भूमिका केल्या आहे. मात्र त्याच्या कुटुंबाला आपला मुलगा चित्रपटात काम करू नये ...

आमिर खानने बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटात रचनात्मक भूमिका केल्या आहे. मात्र त्याच्या कुटुंबाला आपला मुलगा चित्रपटात काम करू नये असे वाटत होते. ‘माझी स्वत:ची व कुुटुंबाची मी इंजिनीअर व्हावे अशी इच्छा होती . माझ्या कुटुंबाला मी चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते. असा खुलास आमिरने एका मुलाखतीत केला. बॉलिवूडशी आमिरचा तसा जुणाच संबध आहे. त्याचे वडील ताहीर हुसैन दिग्दर्शक व काका नासीर हुसैन निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. मामी चित्रपट महोत्सवा दरम्यान एका मुलाखतीत त्याने आपल्या जीवनाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला. आमिर म्हणाला, माझे कुुुटुंबाची पार्श्वभूमी चित्रपटांची होती, पण त्यांना मी चित्रपटात यावे असे वाटत नव्हते, कारण चित्रपटातील करिअरमध्ये अनेक चढ-उतार येतात, हे त्यांच्या भितीचे मुख्य कारण होते. त्यावेळी सर्वांना असे वाटायचे की चित्रपट सृृष्टी काम करण्यासाठी चांगली जागा नाही. माझे वडील, नासीर साहेब (नासीर हुसैन) मला म्हणाले, चित्रपटात येऊ नकोस. माझ्या आईची देखील अशीच समजूत होती. माझ्या कुटुंबाला मी स्यायी नोकरी करावी असे वाटायेचे. त्याच्या मते मी इंजिनीअर, डॉक्टर किंवा चार्टर्ड आकाऊंटंटची नोकरी करावी. कधीकधी मलाही असेच वाटायचे असे तो म्हणाला. मी चित्रपटांना जवळून पाहिले, मी लहान असताना चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. हा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मात्र मी कुणालाही न सांगता पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी मी चित्रपटात येण्याचा पूर्ण निश्चय केला होता.