Join us

आमिरचा आदर वाटतो- सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:13 IST

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा नेहमीच अभिनेत्री सोनम कपूरसाठी प्रेरणा ठरलेला आहे. ती तिच्या आगामी चित्रपटांसाठी त्याचे मत ...

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा नेहमीच अभिनेत्री सोनम कपूरसाठी प्रेरणा ठरलेला आहे. ती तिच्या आगामी चित्रपटांसाठी त्याचे मत नेहमी घेते. ती म्हणते,' रांझणा जेव्हा प्रदर्शित होणार होता तेव्हा त्याने चित्रपटासाठी गुड विशेस दिल्या होत्या.आता मी माझ्या आगामी चित्रपटांसाठी त्याचे मत घेऊ इच्छिते. 'नीरजा' रिलीज झाल्यानंतर मी त्यांच्याकडून अशाच पाठिंब्याची अपेक्षा करते. मी आमीरचा खुप आदर ठेवते. मी त्यांच्या मताचा आदर करते. त्यांना नीरजा आवडला तर मला फार आनंद होईल, ' मुंबईतील 'रेनॉल्ट सोनी गिल्ड अँवॉर्ड्स २0१६ ' वेळी बोलताना सोनम कपूर म्हणाली. दिग्दर्शक राम माधवानी यांचा आगामी चित्रपट 'नीरजा' १९ फे ब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.