Join us  

आमिर खानच्या आईने ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटासाठी त्याला दिले हे खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 1:24 PM

आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटातील लूक हा त्याच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा वेगळा असून हा लूक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या चित्रपटातील आमिरच्या फिरंगी लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लूकमध्ये आमिरने डोळ्यात काजळ लावले असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, महानायक अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ठग्स आॅफ हिंदुस्तान या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. याआधी या चित्रपटातील अनेक पात्रांचा फर्स्ट लूक पोस्टरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता. सर्वात शेवटी चित्रपटातील लीड हिरो अर्थात आमिर खानचा लूक रिलीज केला गेला. आमिर खानचा या चित्रपटातील लूक हा त्याच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा वेगळा असून हा लूक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या चित्रपटातील आमिरच्या फिरंगी लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लूकमध्ये आमिरने डोळ्यात काजळ लावले असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आमिरसाठी हे काजळ खूपच खास आहे. डोळ्यांत काजळ घातल्याने आमिर खूपच वेगळा दिसत आहे. हे काजळ आमिरला त्याच्या आईने गिफ्ट म्हणून दिले आहे. आईने दिलेले काजळ या भूमिकेसाठी वापरल्याने हा लूक त्याच्यासाठी खूपच खास आहे. 

ठग्स आॅफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आपल्याला थेट १७९५ सालात घेऊन जातो. ईस्ट इंडिया कंपनी आली होती व्यापार करायला पण आता भारतावर राज करू लागली आहे. मात्र काही लोकांना गुलामी मान्य नव्हती, अशा संवादाने ट्रेलरला सुरुवात होते. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दिसतो. तो पाहून अंगावर शहारे येतात. या आझादला पकडण्यासाठी इंग्रजांना आझादसारखाच बहादूर ठग हवा असतो. हा ठग म्हणजे आमिर खान. आमिर खानची ट्रेलरमध्ये एन्ट्री जबरदस्त आहे. त्याचा विनोदी अंदाज मनाला भावत असल्याचे त्याचे फॅन्स ट्रेलर पाहून सांगत आहेत. पुढे आमिर आणि अमिताभची जुगलबंदीही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. कॅटरिनाचा ग्लॅमरस अंदाज, फातिमाचा अ‍ॅक्शन अंदाज सगळेच काही नजर खिळवून ठेवत असल्याने या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानआमिर खानअमिताभ बच्चन