Join us  

आमिर खानची मुलगी इराचा हा बोल्ड लूक पाहून तुम्हीही म्हणाल, OMG!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 10:21 AM

काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देइराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमे-यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.इराने तिचा फोटो शेअर केला आणि सगळेच तिचे ‘दिवाने’ झालेत. या फोटोत इरा  बेली पियर्सिंग आणि अ‍ॅब्ज फ्लॉन्ट करताना दिसतेय. रेड ब्रालेट आणि डेनिम शॉट, मल्टिपल ब्रेड स्टाईल हेअर स्टाईल अशी तिची अदा आहे. या फोटोला ‘Who are you?’ असे कॅप्शन तिने दिले आहे.

याआधीही इराने Who are you? हा प्रश्न विचारत, स्वत:च त्याचे उत्तर दिले होते. ‘माझ्याकडे कधीच या प्रश्नाचे उत्तर नव्हते आणि आत्ताही नाहीये. परंतु आयुष्यात काही वळणावर हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे, यानेच मला आनंद दिला आहे,’ असे ती म्हणाली होती.

काही दिवसांपूर्वीच स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा व मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

खुद्द इराने हा व्हिडीओ शेअर केला होता. यात व्हिडीओत इरा व मिशाल कपल डान्स करताना दिसले होते. ‘मला फक्त तुज्यासोबत डान्स करायचा आहे’, असे हा व्हिडीओ शेअर करताना इराने लिहिले होते.

इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता.

टॅग्स :आमिर खान