Join us  

हा आहे आमिर खानचा मराठमोळा जावई, जाणून घ्या नुपूर शिखरेविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:51 PM

आमिर खानचा हा होणारा जावई कोण आहे असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल... तर आज आम्ही तुम्हाला नुपूर शिखरेविषयी सांगणार आहोत.

ठळक मुद्देसध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. इरा खानला तो गेल्या काही महिन्यांपासून फिटनेसचे धडे देत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघे जवळ आल्याचे म्हटले जाते.

आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा फिटनेस कोच नुपूर शिखरे बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करतायेत. व्हॅलेंटाईन वीकमध्ये इराने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत रिलेशनशीप जवळजवळ कन्फर्म केलं आहे.

इराने प्रॉमिस डेला नुपूरसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यात 'माय व्हॅलेंटाईन' चा हॅशटॅगही देण्यात आला आहे. इराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं अभिमानाची गोष्ट आहे. नुपूर शिखरेने इराला 'आय लव यू' म्हणत या पोस्टला उत्तर दिले आहे.

आमिर खानचा हा होणारा जावई कोण आहे असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल... तर आज आम्ही तुम्हाला नुपूर शिखरेविषयी सांगणार आहोत. नुपूर शिखरे हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. इरा खानला तो गेल्या काही महिन्यांपासून फिटनेसचे धडे देत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघे जवळ आल्याचे म्हटले जाते. इराच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. नुपूर सध्या इरासोबत सतत पाहायला मिळतो. इराच्या चुलत बहिणीच्या म्हणजेच दिग्दर्शक मन्सूर खान यांच्या मुलीच्या लग्नाला देखील नुपूर इरासोबत उपस्थित होता. 

नुपूर हा खूप चांगला डान्सर देखील आहे. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्याचे डान्सचे फोटो पाहायला मिळतात. नुपूरसोबत इराने घरातील सगळ्यांची ओळख करून दिली आहे.

टॅग्स :इरा खान