Join us

आमिर खान खुप हुशार व्यक्ती -रिदिमा अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:24 IST

अभिनेत्री रिदीमा सुद ही जोया अख्तर यांच्या 'दिल धडक ने दो' यांच्या आगामी चित्रपटात डेब्यू करणार आहे. तिने अल्पावधीत ...

अभिनेत्री रिदीमा सुद ही जोया अख्तर यांच्या 'दिल धडक ने दो' यांच्या आगामी चित्रपटात डेब्यू करणार आहे. तिने अल्पावधीत सर्व समीक्षक आणि बॉलीवूड इंडस्ट्रीला तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित करून टाकले आहे. पण, 'डीडीडी' म्हणजे दिल धडकने दो हा तिचा काही पहिला चित्रपट नाही तर तिने मधुरिता आनंद यांच्या 'कजारया' मध्ये महिलांच्या संदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न यांवर शूटिंग केले आहे. तिने आमीर खान विषयी तिचे काही मत व्यक्त केले. ती म्हणते,' गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या सक्षमीकरणाविषयी बोलले जात असून महिलावादी विचारसरणी मागे टाकून पुरूषसत्ता पुढे जाते हे जाणवते आहे. आपण एकत्र काम करायला शिकायला हवे. तरच विकास होईल. यात आमीर खानचे म्हणणे मला योग्य वाटते. आमीर खान एक खुपच हुशार व्यक्ती आहे. '