Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता आमिर खानही कोरोनाच्या विळख्यात, घरात स्वतःला केले क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:42 IST

आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने घरीच स्वतःला क्वारंटाइन केले आहे.

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यात कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील बरेच कलाकार अडकले आहेत. आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने घरीच स्वतःला क्वारंटाइन केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने त्याच्या स्टाफलादेखील कोरोनाची टेस्ट करायला सांगितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर खानने त्याच्या स्टाफला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय सर्व नियम आणि काळजी घेण्यासही सांगितले आहे. बरे वाटल्यानंतर आमिर खान लाल सिंग चड्ढाचे शूटिंग करणार आहे.

आमिर खानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाला अलविदा केला आहे. आमिरने त्याची शेवटची पोस्ट शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली होती. त्याने या पोस्टमध्ये सांगितले होते की, ही त्याची शेवटची पोस्ट असून तो सोशल मीडियाला रामराम ठोकत आहे. त्याला त्याचे संपूर्ण लक्ष कामाकडे केंद्रित करायचे असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. आमिरच्या आगामी चित्रपटांविषयी, तसेच त्याच्याविषयी अपडेट्स त्याच्या चाहत्यांना आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर पाहायला मिळतील.

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो शेवटचा ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये झळकला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. त्यानंतर आता तो लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :आमिर खानकोरोना वायरस बातम्या