Join us  

'ज्यांना देशाची काळजी आहे...', निवडणूक काळात आमिर खानने शेअर केला सत्यमेव जयतेचा जुना प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:00 PM

आमिर खानने 'सत्यमेव जयते'चा जुना प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

आमिर खान एक यशस्वी अभिनेता, निर्माता, चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्धीपासून मार्केटिंगपर्यंतची सगळी गणितं जाणणारा जाणकार 'मि. परफेक्शनिस्ट'. त्याचा छोट्या पडद्यावरील 'सत्यमेव जयते' हा  देशातील सामाजिक समस्यांना प्रकाशझोतात आणणारा कार्यक्रम चांगलाच जागला. आता यातच आमिर खानने 'सत्यमेव जयते'चा जुना प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

आमिर खान प्रॉडक्शनच्या अधिकृत हँडलने इंस्टाग्रामवर  'सत्यमेव जयते'चा एक जुना प्रोमो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहलं, 'रविवार सकाळी ११ वाजले आहेत आणि तुम्ही सत्यमेव जयते पुन्हा पाहण्याचा विचार करत आहात'. प्रोमोमध्ये आमिर खान हा सिग्नलवर नियमांचे पालन करणाऱ्या आणि नियम तोडत धावणाऱ्या गाड्यांकडे पाहात यावरुन 'सत्यमेव जयते' कार्यक्रम कोण पाहिलं याचा अंदाज बांधताना पाहायला मिळत आहे. सिग्नलवर थांबणारे प्रत्येकजण शो पाहतील तर जे सिग्नल तोडतात ते पाहणार नाहीत, असे तो म्हणतो. 

प्रोमोचा शेवट 'ज्यांना देशाची काळजी आहे, 'सत्यमेव जयते', या वाक्याने होते.  या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी अभिनेत्याला होस्ट म्हणून परत येण्याची आणि चॅट शो पुन्हा सुरू करण्याची विनंती केली.  'सत्यमेव जयते' कार्यक्रमातून सामाजिक समस्यांविषयी जागरुकता पसरविण्याचा यापूर्वीचा आमिरचा प्रयत्न यशस्वी झाला.

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आमिर 'तारे जमीन पर'चा सिक्वेल असलेल्या 'सीतारे जमीन पर' या चित्रपटात काम करत आहे. त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. या चित्रपटात आमिरसोबत दर्शील सफारी पुन्हा दिसणार आहे. आमिरचा शेवटचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच खराब कामगिरी केली, त्यानंतर अभिनेत्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटीराजकारण