Join us  

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाचा फर्स्ट लूक आऊट, ही आहे लूकची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:15 AM

काही दिवसांपूर्वी त्याचा या सिनेमातील लूक व्हायरल झाला होता त्यावेळी त्याला ओळखणं ही अनेकांना कठीण गेले होते.

अभिनेता आमिर खानचा  बहुप्रतिक्षीत सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'मधील त्याचा लूक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लीक झाला होता. त्यानंतर आता आमिर खानने स्वत: सिनेमातील फर्स्ट लूक आऊट शेअर केला आहे.  या फोटोत आमिर खान लाल सिंग चड्ढा लूकमध्ये दमदार दिसतो आहे. त्याने लाइट पर्पल रंगाचा ग्रे पॅण्ट परिधान केली आहे. तसेच त्याने पर्पल रंगाची पगडीदेखील बांधली आहे. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

 या सिनेमात आमिरसोबत करीना कपूरसुद्धा दिसणार आहेत. करीना कपूरचा या चित्रपटातील फोटो लीक झाला आहे त्यात ती देसी लूकमध्ये दिसते आहे. करीना कपूरने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे.

लाल सिंग चड्ढा चित्रपटातून आमिर खान २ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. शेवटचा को ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये झळकला होता. लाल सिंग चड्ढा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :आमिर खानकरिना कपूर