Join us  

सुशांत-श्रद्धाच्या ‘छिछोरे’मध्ये बॉलिवूडच्या ‘खान’ची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:53 PM

‘दंगल’ या चित्रपटानंतर नीतेश तिवारी ‘छिछोरे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी नीतेश यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला होता. आता ‘छिछोरे’बद्दल एक खास खबर आहे.

ठळक मुद्दे‘छिछोरे’मध्ये सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.  ‘छिछोरे’ सिनेमा पुढील वर्षी ३० आॅगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सन २०१६ मध्ये प्रदर्शित नीतेश तिवारींच्या ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटानंतर नीतेश तिवारी ‘छिछोरे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी नीतेश यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला होता. आता ‘छिछोरे’बद्दल एक खास खबर आहे. होय, नीतेश यांच्या या आगामी या चित्रपटात सुपरस्टार ‘खान’ची एन्ट्री झालीय. हा ‘खान’ कोण तर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान.

होय, ‘छिछोरे’मध्ये आमिर खान कॅमिओ करताना दिसणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरला या चित्रपटाची स्क्रिप्ट प्रचंड आवडली. त्यामुळेच नीतेश ‘छिछोरे’मध्ये कॅमिओ करण्याबद्दलचा प्रस्ताव घेऊन आमिरकडे गेले तेव्हा आमिरने म्हणे, क्षणाचाही वेळ न घालवता या चित्रपटाला होकार दिला. ‘दंगल’ या चित्रपटानंतर आमिर व नीतेश यांचा चांगला बॉन्ड तयार झाला आहे. दोघेही ‘दंगल’नंतर एकत्र काम करण्याची इच्छा बाळगून होते. ‘छिछोरे’च्या निमित्ताने दोघांचीही ही इच्छा पूर्ण झाली, असेच म्हणता येईल.

‘छिछोरे’मध्ये   सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.  ‘छिछोरे’ सिनेमा पुढील वर्षी ३० आॅगस्टला प्रदर्शित होणार आहे.  तूर्तास आमिर खान त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत बिझी आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा आॅस्कर विजेत्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडपटाचा रिमेक असेल.  १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आॅस्कर जिंकला होता. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. आणखी एक खास सरप्राईज म्हणजे, यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे.

टॅग्स :आमिर खानश्रद्धा कपूरसुशांत सिंग रजपूत