Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ व्यक्तीने आमिर खानला बॉलिवूडमध्ये केले लॉन्च; पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 15:58 IST

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या परिवारासमवेत सुट्या एन्जॉय करीत आहे. ५२ वर्षीय आमिर खान सध्या पत्नी ...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या परिवारासमवेत सुट्या एन्जॉय करीत आहे. ५२ वर्षीय आमिर खान सध्या पत्नी किरण राव आणि मुलगी आजादसोबत तामिळनाडू येथील कुनूर हिल स्टेशनमध्ये सुट्या एन्जॉय करीत आहे. आमिरचा मुलगा आजाद आता सहा वर्षांचा झाला आहे. आमिर खानने याठिकाणी आपला कजिन आणि दिग्दर्शक मन्सूर खानचा ६० वा वाढदिवस साजरा केला. आमिरने आपल्या ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर करताना सांगितले की, ‘आम्ही सर्व मन्सूरचा ६०वा वाढदिवस साजरा करीत आहोत. यावेळी आमिरने त्याच्या इन्स्टाग्रामवर नऊ फोटो शेअर करतानाच एक कोलाज फोटोही शेअर केला. तुमच्या माहितीसाठी मन्सूर खान आमिरचा चुलत भाऊ आहेत. मन्सूर यांनी आमिर खानसोबत सुरुवातीला ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. हे सर्व चित्रपट मन्सूर यांनी दिग्दर्शित केले असून, त्यात आमिर मुख्य भूमिकेत बघावयास मिळाला. आमिरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासही मन्सूर खानलाच क्रेडिट जाते. भलेही आमिरने ‘यादों की बारात’ या चित्रपटातून १९७३ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला असो, पण त्याला खरी ओळख ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातूनच मिळाली आहे. या चित्रपटाला मन्सूर खान यांचे वडील व आमिर खानचे काका नासिर हुसैन यांनी प्रोड्यूस केले होते. त्याचबरोबर या चित्रपटाचे लेखक म्हणूनच नासिर हुसैन यांनी जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, आमिर जेव्हा जेव्हा हॉलिडे ट्रिपवर असतो, तेव्हा तो त्याच्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करीत असतो. गेल्यावर्षी परिवारासमवेत रोममध्ये फिरायला गेलेल्या आमिरने पत्नी किरण राव आणि मुलगा आजादसोबतचे काही फोटो शेअर केले होते. शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमिरने सेल्फी फोटो ट्विट केले होते. दरम्यान, आमिर सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांचीदेखील महत्त्वाची भूमिका असून, पहिल्यांदाच हे दोघे, एकत्र स्क्रीन शेअर करीत आहेत.