Join us  

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चा मुहूर्त ठरला, 'या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 6:00 AM

आमिर खान याने वाढदिवसाच्या दिवशी आपला आगामी प्रोजेक्ट 'लाल सिंग चड्ढा'ची घोषणा केली होती. त्यापासून या सिनेमाची उत्सुकता आमिरच्या फॅन्सना लागली आहे.

ठळक मुद्देपुढच्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेलाल सिंग चड्ढा’ हा सिनेमाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहे

आमिर खान याने वाढदिवसाच्या दिवशी आपला आगामी प्रोजेक्ट 'लाल सिंग चड्ढा'ची घोषणा केली होती. त्यापासून या सिनेमाची उत्सुकता आमिरच्या फॅन्सना लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा 'फॉरेस्ट गम्प' या ऑस्कर विजेत्या सिनेमाचा रिमेक असेल. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ऑस्कर जिंकला होता. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. या  सिनेमाचे लेखन मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी ‘फॉरेस्ट गम्प’या चित्रपटाचे हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या चित्रपटाबाबत मी अतुल कुलकर्णीसोबत रंग दे बसंती या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चर्चा केली होती. ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.मात्र या चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमीरला पाहणे कमालीचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी आमीर खानचा फ्लाईटमधला व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात आमिर इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसत होता. आमिरसारखा इतका मोठा दिग्गज स्टार इकॉनॉमी क्लासने प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर याचमुळे आमिरचे कौतुक झाले होते. अनेकजण आमिरच्या साधेपणाचे आणि विनम्रतेचे कौतुक केले होते.  

टॅग्स :आमिर खान