Join us  

स्वत:च्या लेकीच्या नाही पण अंबानींच्या लग्नात का नाचलास? चाहत्याच्या प्रश्नावर आमिर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 5:07 PM

अंबानींच्या पार्टीत नाचणाऱ्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना आमिर खानने दिलं उत्तर

रिलायन्सचे इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंटसोबत त्याचा विवाह होणार आहे. यापूर्वी अंबानी कुटुंबियांनी गुजरातच्या जामनगरमध्ये १ ते ३ मार्च रोजी भव्य असा प्री वेडिंग सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी हॉलिवूड, बॉलिवूड, क्रीडा, उद्योग, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्यात बॉलिवूडचे तीन बडे खान शाहरुख, सलमान आणि आमिर तिघांनी एकत्र येत डान्स परफॉर्मन्स दिला. अंबानींच्या पार्टीत नाचल्यामुळे नेटकऱ्यांनी सर्वच सेलिब्रिटींना ट्रोल केलं. आता यावर स्वत: आमिर खाननेच (Aamir Khan) स्पष्टीकरण दिलं आहे.आमिर खानने आज इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने येणाऱ्या प्रोजेक्ट्सची माहिती दिली. तसंच लाईव्हमध्ये चाहते कमेंट करुन प्रश्न विचारत होते. त्यांनाही उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने विचारलं, 'तु तुझ्या मुलीच्या लग्नात नाही नाचलास मग अंबानींच्या पार्टीत का नाचलास?' यावर आमिर म्हणाला, "डान्स तर मी माझ्या मुलीच्या लग्नातही केला होता. मुकेशच्या मुलीच्या लग्नातही केला. मुकेशसोबत माझी घट्ट मैत्री आहे. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. मुकेश, नीता, त्यांची मुलं आम्ही कुटुंब आहोत. मी त्यांच्या लग्नात नाचतो ते माझ्या लग्नात नाचतात.  (पुढे चूक सुधारत म्हणाला) म्हणजेच फॅमिलीच्या."

तसंच यावेळी आमिरने आगामी 'सितारे जमीन पर'विषयीही माहिती दिली. तो म्हणाला, "सितारे जमीन पर हा सिनेमा म्हणजे तारे जमीन पर ची पुढची लेव्हल आहे. जितकं तारे जमीन परने तुम्हाला रडवलं तेवढंच सितारे जमीन पर तुम्हाला हसवणार आहे."

सध्या आमिरचे निर्माता म्हणून काम सिनेमे सुरु आहेत. यामध्ये किरण रावचा 'लापता लेडीज' जो नुकताच रिलीज झाला आहे. तसंच आमिर मुलगा जुनैद खानलाही 'महाराजा' सिनेमातून लाँच करतोय. शिवाय सनी देओलच्या 'लाहोर 1947' या सिनेमाची निर्मितीही आमिर खान करत आहे.

टॅग्स :आमिर खानअनंत अंबानीमुकेश अंबानीट्रोलसोशल मीडिया