Join us  

'या' लोकप्रिय अभिनेत्रीच्या एका फोटोमुळे आलं होतं मोठं वादळ, एका चुकीमुळे उध्वस्त झाले तिचे करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 3:08 PM

.  1992 मध्ये 'तिरंगा' सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमातून  ममता कुलकर्णीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमात ममताने छोटी भूमिका साकारली होती.

ममता कुलकर्णी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक गणली जायची. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाने लोकांना वेड लावले होते.आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या.  1992 मध्ये 'तिरंगा' सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमातून  ममता कुलकर्णीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमात ममताने छोटी भूमिका साकारली होती. 1993 मध्ये ‘आशिक आवारा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमाने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली.

याच दरम्यानच्या काळात ममता कुलकर्णीने टॉपलेस फोटोशूट केले आणि वादाच्या भोवऱ्या सापडली.  फोटोशूट रसिकांना रुचलं नाही. अनेकांनी या फोटोशूटवरुन ममता कुलकर्णीवर टीकाही केली होती. हे फोटोपाहून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या. इतकंच नाहीतर काही लोकांनी ममता कुलकर्णीला ठार मारण्याचीही धमकी दिली होती.

 

 स्टारडस्ट मॅगझिनच्या कव्हर शूटसाठी नवीन चेहरे शोधले जात असताना अनेक अभिनेत्रींनी नकार दिला. त्याचवेळी ममता कुलकर्णी यांचे नाव सुचविण्यात आले आणि ममतानेही लगेचच फोटोशूट करण्यास सहमती दर्शविली. जेव्हा हे फोटोशूट साधं सुध नसून टॉपलेस असणार आहे हे सांगण्यात आले तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

ममताला हे फोटोशूट केल्यानंतर मोठी समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची आधीपासूनच कल्पना होती.हे फोटोशूट हिट ठरले तर ठिक फ्लॉप झाले तर कुटुंबियही दुरावतील आणि इंडस्ट्रीतून बाहेर फेकली जाईल अशी भीतीही तिच्या मनात होती.म्हणून शूट करण्यासाठी तिने दोन ते तीन दिवसाचा वेळ मागितला. तसेच एक अटही ठेवली, फोटोशूट तिला आवडले तरच ते पब्लिश केले जाईल.

या अटीवर हे फोटोशूटही करण्यात आले आणि ते पब्लिश करण्यात आले. हे मॅगझिन पब्लिश होताच ममता विरोधात निदर्शने करण्यात आली. एकीकडे रसिकांचा संताप होत होता तर दुसरीकडे आमिर खान, सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी मात्र ममताच्या या फोटोशूटचे आणि धाडसाचे कौतुकही केले.

ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर ड्रग तस्करी करणारा विजय गोस्वामीच्या नावासह तिचे नाव जोडले गेले होते. ड्रग तस्करीच्या प्रकरणात विजय गोस्वामीला नंतर अटक झाली. दुसरीकडे ममात कुलकर्णीनेही सन्यास घेतला.

टॅग्स :ममता कुलकर्णी