Join us  

​८० किलोंच्या ड्रेसने उर्वशी रौतेलाचे केले हाल! आली बेशुद्ध पडण्याची वेळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 9:46 PM

 बँकॉकमध्ये काल रंगलेल्या आयफा अवार्डस 2018 अनेक बॉलिवूड सुंदरींनी ग्रीन कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यात एक अभिनेत्री अशीही होती, ...

 बँकॉकमध्ये काल रंगलेल्या आयफा अवार्डस 2018 अनेक बॉलिवूड सुंदरींनी ग्रीन कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यात एक अभिनेत्री अशीही होती, जिच्या ड्रेसवरून लोकांच्या नजरा हटता हटेनात. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री उर्वशी रौतेलाबद्दल. होय, उर्वशी या सोहळ्यात एकदम हटके लूकमध्ये दिसली. तिच्या लाईट पिंक कलरच्या गाऊनमुळे ती चांगलाच भाव खावून गेली. पण हा गाऊन सांभाळता सांभाळता उर्वशीच्या नाकीनऊ आले़ इतके की, बेशुद्ध पडण्याइतपत स्थिती तिच्यावर ओढवली. आता तुम्हाला खरे वाटणार नाही़ पण हे खरे आहे. कारण उर्वशीने या सोहळ्यात घातलेला गाऊन तब्बल ८० किलोंचा होता. अंगावर हा ८० किलोंचा गाऊन वाहून नेतांना उर्वशीची काय अवस्था झाली असणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कराउर्वशी हा गाऊन घालून दिमाखात ग्रीन कार्पेटवर आली खरी. पण तिच्याने धड चालणेही होईनात. गाऊनच्या वजनामुळे तिची पाऊले अडखळायला लागली. एका क्षणाला आपण बेशुद्ध पडू, असे तिला वाटू लागले. हा ड्रेस घालून चालतांनाचा एक व्हिडिओ उर्वशीने सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत उर्वशी कमालीची सुंदर दिसतेय. पण या व्हिडिओत उर्वशीची ड्रेस सांभाळताना किती दमछाक झाली, तेही स्पष्ट दिसतेय. बॉलिवूडची सेलिब्रिटी फॅशन डिझाईनर अर्चना कोचर हिने उर्वशीचा हा ड्रेस डिझाईन केला होता.  ALSO READ : बोल्ड ब्यूटी उर्वशी रौतेलाने बाथटबमध्ये अंघोळ करतानाचे फोटो केले शेअर!!  लीकडे उर्वशीचा ‘हेटस्टोरी4’ हा चित्रपट रिलीज झाला. पण तिच्या या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. उर्वशी रौतेला ही बी-टाऊनमधील एक हॉटेस्ट अभिनेत्री आहे. सनी देओलच्या ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर ‘भाग जॉनी’, ‘सनम रे’ या चित्रपटांमध्ये उर्वशी दिसली. यानंतर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये उर्वशी सेक्सी अवतारात चाहत्यांसमोर आली. अर्थात  हा अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपट बॉक्सआॅफिसवर अपयशी ठरला.