Join us

7 Launch of special music video directed by Nagraj Manjule to announce of Satyamev Jayate water cup

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 15:40 IST

आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आलीय. यावेळी मुख्यमंत्र्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.

आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आलीय. यावेळी मुख्यमंत्र्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. आमिरच्या वॉटर कॅप स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी नागराज मुंजेळेंने या स्पर्धेसाठी दिग्दर्शित केलेल्या एका व्हिडीओचे लाँचिग सुद्धा करण्यात आले.या व्हिडीओला संगीत अजय-अतुल या जोडीने दिले आहे.या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमिरची पहिली पत्नी रिना दत्तही हजर होती.या वॉटर कॅप व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच आपल्याला किरण रावचा आवाज ऐकायला मिळणार आहे.गुरु ठाकूरने यातील गाण्याचे शब्द लिहीले आहेत.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आमिरच्या वॉटर कॅप स्पर्धेला पाठिंबा दर्शवण्यासाठी आली होती.